चंद्रपूर शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी आपल्या क्लिनिक मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे.
शहरातील मुख्य मार्गावरील चर्च समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचा नेत्र दवाखाना आहे, रात्री 8 ते 8. 30 दरम्यान क्लिनिक मधील रेस्टरूम मध्ये डॉ. अग्रवाल यांनी हेवी डोज चे इंजेक्शन घेतले होते.
डॉक्टरने इंजेक्शन घेतल्याची बाब ज्यावेळी उघडकीस आली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता, डॉ. उमेश अग्रवाल यांची पत्नी सुद्धा डॉक्टर असल्याची माहिती आहे.
घटणेची माहीती पोलीसांना मिळताच पोलिस घटणास्थळी पोहचली व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिसांकडून अधिक तपास सूरू आहे.