कारंजा : महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले कारंजाचे ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र भूषण लोककलावंत,संजय कडोळे यांचे लहान भाऊ कारंजा नगरीचे भुमिपुत्र तथा गोंधळी लोककलावंत स्व.उमेश मधुकरराव कडोळे ( वय ५४ ) यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे.मृत्युनंतर समाजात तेरवीची प्रथा असते.त्यामुळे स्वाभाविकपणे, "तेरवी केव्हा करणार ?" असा प्रश्न समाजातून विचारल्या जात असतो.परंतु जीवलगाच्या मृत्युमुळे दुःखात असणाऱ्या, कुटुंबाकडून , तेरवी किंवा गोडजेवणाची पद्धतच चुकीची असून,अशा चुकीच्या पद्धतींना फाटा देत संजय कडोळे यांनी अनाथ,निराधार व्यक्तींमध्ये 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून तेरवीचा लागणारा खर्च समाजातील वयोवृद्ध,अनाथ,निराधार आणि वृद्धाश्रमातील गरजूंकरीता खर्च करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळविल्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रदिप वानखडे यांनी कळविले आहे.