अकोला:- दोनशेच्यावर निर्यात शोध लावणारे चाळीसहून अधिक संशोधनाचे एकस्व संपादन करणारे आणि शतक पूर्वी भारतीयांच्या नावाने नाक मुरडणाऱ्या अमेरिकन लोकांमध्ये मानाच स्थान मिळवणाऱ्या डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांची कथा शाळेत असताना एकदा वाचनात युरोपियन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञा बद्दल केलेले विधान आले व त्या युरोपियन शास्त्रज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांवर ताशेरे ओढले होते व संशोधन करून एखादा नव यंत्र तयार करण्याच्या तंत्र भारतीय शास्त्रज्ञांकडे नाही फार तर ते यंत्र चालवू शकतील फारच झाले तर त्या यंत्राची नकल करतील या पलीकडे भारतीय शास्त्रज्ञांची झेप नाही असा उल्लेख त्यात होता भारतीय शास्त्रज्ञ बद्दल युरोपीय शास्त्रज्ञांनी केलेल्या बेलगाम विधान ऐकून धुळ्याच्या शाळेत शिकत असलेल्या त्या चिमुरड्या मुलांना युरोपियन यांचे हे वाघ विधान त्यांच्याच धरतीवर जाऊन त्यांना पुसायला लावीन असा निर्धार केला लहानपणी एकदा भिसे साखर आणायला वाण्याकडे गेले त्यावेळी वाण्याने लबाडी करून कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत त्यांनी व्यापाऱ्याला विचारलं असता माझ्या काट्यावर विश्वास नसेल तर आपोआप वजन करणारी यंत्र शोधून काढ असे त्या वाण्याने त्याला खोचकपणे म्हटले त्यावेळी एक दिवस तुला असे यंत्र दिन असे ठामपणे छोटे शंकरराव त्याला म्हणाले साधारण एकूण 1897 मध्ये इव्हेंटर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड या मासिकाने स्वयंमापन यंत्र करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर पीठ इत्यादी वस्तूचे गिऱ्हाईकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र शंकर रावांनी अशा यंत्राचा आराखडा करून पाठवला त्यावेळी शंकर रावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला तयार केलेले हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवले यानंतर 1900 मध्ये भिसे यांचे लक्ष आवर्जून मुद्रण व्यवसायातील यंत्रसामग्री कडे लागले त्याकाळी प्रचलित असलेल्या लाईनो मोनो इत्यादी यंत्राचा रचना आणि कार्यामर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी भिसे टाईप या यंत्राचा शोध लावला व त्याचे अप्रतिम इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिका जर्मनी फ्रान्स या देशांमध्ये पेटंट घेतलं आणि या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून द टाटा भिसे इव्हेन्शन सिंडिकेट ही कंपनी लंडन येथे 1910 मध्ये स्थापन केली पण 1915 मध्ये ती बंद पडली व त्या सुमारास दर मिनिटाला साधारण बाराशे अक्षर छापणारं गणित मातृका हे यंत्र तयार केले आणि 1916 मध्ये ते विक्रीला आणलं 1916 यावर्षी भिसे अमेरिकेला गेले तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार आयडियल टाईप कल कास्टर हे यंत्र शोधून काढले आणि अमेरिकेत त्यांचे एकस्व घेतले व या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी भिसे आयडियल टाईप कास्टर कार्पोरेशन ही कंपनी स्थापन करून 1921 मध्ये पहिलं यंत्र विक्रीला आणला याशिवाय मुद्रण व्यवसायातील आणखी अशी अनेक यंत्र त्यांनी तयार केली