कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)
कारंजा शहरासह तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी . या हेतूने स्व. आ प्रकाशदादा डहाके यांच्या अथक प्रयत्नातून कारंजा येथे उपजिल्हा रुग्णालयाची
भली मोठी इमारत बांधण्यात आली.परंतु काही सुविधा मात्र
या रुग्णालयात अपुऱ्याच राहल्या परिणामी
रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागते.शिवाय रुग्णालयातील कारभार दिवसेंदिवस ढिसाळ होत गेला. सदर रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच चर्चित राहत आहे. कधी तेथील डॉक्टर नशेत कार्य करतांना आढळतात.तर कधी तेथील आरोग्य कर्मचारी कामचुकार पद्धतीने वागून एकमेकांविरुद्ध उभे राहताना दिसतात.तर कधी रुग्णालयात औषधोपचाराकरिता भरती केलेला रुग्ण रुग्णालया बाहेर जाऊन नशा करून आत मध्ये येण्याचा प्रयत्नात रुग्णाचा कधी मृत्यू होतो.हे सुद्धा येथील कर्मचाऱ्यांना माहित राहत नसण्याचा प्रकार घडला आहे. रुग्णालयातील अस्वच्छता सुद्धा प्रचलित आहे . त्यामुळे महत्त्वाचे विषय आज रोजी चर्चेत आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या वॉशरूम मध्ये पाण्याच्या कमतरते मुळे तेथील रुग्णांचे हाल होत असल्याचे प्रकार नुकताच चर्चित राहला आहे.
ज्या डॉक्टर ने कोरोणा काळात संपूर्ण हॉस्पिटल सांभाळले त्या डॉक्टरवर आज असंवैधानिक कारणाने आरोप होत असल्याचे दिसत आहे. म्हणजेच हॉस्पिटलमध्ये होत असलेला गैरप्रकार व भ्रष्टाचार रोखण्याला विरोध करणाऱ्या एका डॉक्टरला विरोध होत असल्याचे दिसत आहे.या सर्वा मागे जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र बघ्याची भूमिका निभावतांना दिसत आहे.
कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील कारभार चांगल्या डॉक्टरकडे यावा . त्याकरिता रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला भावनिक साद घालत उपजिल्हा रुग्णालय कारंजा मधील प्रशासनिक कार्यभार व रुग्नेसेसंदर्भात निवेदन दिले आहे. रमेश देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
"कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या पेशंटला योग्य सेवा देता यावी
याकरिता काही बाबींमध्ये महत्वपूर्ण बदल करणे अत्यावश्यक असल्याने सदर बाबी खालीलप्रमाणे नमुद करण्याचा प्रयत्न करित आहे.
१)
शासकीय सेवेत असलेले सर्व डॉक्टर्स व अधिपारिचारिका यांच्या आपल्या स्तरावरुन
करण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्या व आदेशाप्रमाणे कार्यप्रणाली तयार होईपर्यंत रुग्णसेवा देणे
कर्मचाऱ्यांना कठीण झाले असल्याने रुग्णांचे विनाकारण हाल होत असल्याने तात्काळ
प्रतिनियुक्त्या रद्द करुन उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा निरंतर
सुरु करण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन देण्यात यावे.
२) कामरगांव येथे वैद्यकीय अधिक्षकाचे पद रिक्त असल्यामुळे सदर पद भरती करतांना
सेवाज्येष्ठता यादीनुसार सेवा ज्येष्ठ डॉ. जाधव येत असल्यामुळे त्यांची नियुक्ती कारमरगांव
येथे वैद्यकीय अधिक्षक या पदावर करण्याची कृपा करावी.
३) सर्व डॉक्टर्स व अधिपारिचारिकांना अॅप्रन व नेमप्लेट लावून सेवा देण्याचा नियम असतांना सुद्धा तसे होतांना दिसत नाही त्यामुळे रुग्णांची तारांबळ उडते व डॉक्टर आणि पेशंट यामधले अंतर समजत नाही व ग्रामिण भागातील लोकांना याचा फार त्रास सहन करावा लागतो. करिता सर्व डॉक्टर्स व अधिपारिचारिकांना अॅप्रन व नेमप्लेट लावून सेवा
देण्याचे आपले स्तरावरुन आदेशित करावे
४) ओ.पि.डी.चा वेळ ही नियमानुसार सकाळी ८ ते दु.१.०० व सायंकाळी ४ ते ६
वाजेपर्यंत सुरळीत करण्याकरिता आपल्या स्तरावरुन आदेशित करावे.
...२...
५) सद्य:स्थितीत असलेल्या २४ तास डॉक्टरांची सेवा ही नियमानुकुल नसल्यामुळे
सदर सेवास्वरूप खंडित करुन प्रत्येक डॉक्टरांना शासकीय नियमानुसार ८-८ तासानुसार
सेवा देणेकरिता आपल्या स्तरावरुन आदेशित करण्यात यावे. विशेषतः रुग्णांकडे दुर्लक्ष
करु नये असा सल्ला जाणीवपूर्वक वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणे आवश्यक असल्याने आपल्या
स्तरावरुन सदर आदेश देण्यात यावे.
६) कारंजा ग्रामिण रुग्णालयातील बंद असलेले एन.आय.सी.यु.तात्काळ सुरु करण्याची
कृपा करावी.
७) सर्व शासकीय सेवेत रुजु असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी
राहणे आवश्यक असतांना सुद्धा सदर कर्मचारी मनमर्जी कारभार करित असल्याने आपल्या
स्तरावरुन त्यांना आदेशित होणे आवश्यक आहे.
८)
अधिपारिचारिका यांच्या सहाय्यता करिता २-२ अधिपारिचारिका ठेवण्यात
आल्या आहेत. सदर बाब ही बेकायदेशीर असल्यामुळे तात्काळ त्यांची सेवा योग्य त्या
ठिकाणी सुरळीत करण्याचे आदेश देण्यात यावे तसेच प्रत्येक ज्येष्ठ अधिपारिचारिका यांना
१ रात्रपाळी करण्याचे आपल्या स्तरावरुन आदेशित करावे.
९)
सदर ओ.पि.डी.मध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आवश्यक असून सुद्धा
फक्त एन.आर.एच.एम, सेवेत असलेले वैद्यकीय अधिकारीच फक्त ओ.पी.डी.मध्ये हजर
असतात आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिक्षक हे मात्र केव्हाच ओ.पी.डी.मध्ये दिसत नाहीत.
त्यामुळे त्यांना तात्काळ आदेश देवून ओ.पि.डी. रुग्णसेवेकरिता सुरळीत होण्याकरिता
आपले स्तरावरुन संबंधितांना आदेशित करण्यात यावे.
तरी मा.महोदय परिसरातील गोरगरिब जनतेच्या हिताकरिता व त्यांना
शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता शासनाने सर्वतोपरी साहित्य, साधन, सामुग्री,
कर्मचारी उपलब्ध करुन दिलेले आहेत. परंतू केवळ सेवेत रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या व
अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे गोरगरिब जनतेला रुग्णसेवेपासून वंचित राहावे लागते व
त्यांना पुढील उपचाराकरिता विनाकारण रेफर लेटर देण्यात येत असल्याने त्यांना त्यांची
परिस्थिती नसतांना सुद्धा नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
कोरोना काळात ज्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यापेक्षा तालुक्याचे नाव मोठं केलं
होतं अशा अधिकाऱ्याला त्रास देवून त्याची प्रतिनियुक्ती ही कामरगांवला देण्यात आली
आहे. तरी त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना त्यांचे मुळ सेवेत कारंजा येथे रुजू करण्याचे आपल्या स्तरावरुन आदेशित करणे अत्यंत महत्वाचे असल्याने सदर बाबीवर गांभीर्याने
विचार करून संबंधितांना आदेशित करण्यात यावे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....