संत गजानन महाराज यांनी अन्नाचे महत्त्व, तसेच सामाजिक समरसता सोबत मानवता भक्ती श्रद्धा विश्वास परंपरा सोबत विश्वातील सर्वात चांगलं देवस्थान मॅनेजमेंट सोबत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची किमया मार्गदर्शन आशीर्वाद दिल्यामुळे विदर्भाचा नावलौकिक जगात झाला आहे अशा संत गजानन महाराज विदर्भाच्या माऊलीचे भक्त असल्याचा गौरंकित व भक्ती आपण करून सामाजिक दायित्व करीत असल्याचा आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
मोठी उमरी श्री संत गजानन महाराज मंदिर राजाराम नगर येथे संत गजानन महाराज सेवा समिती तर्फे रंणधीर सावरकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संत गजानन महाराज यांच्या पालिकेचे व प्रतिमेचे पूजन करून वारकऱ्यांचे पूजन व स्वागत केले आणि आशीर्वाद घेतले तसेच उमरी परिसर हा भक्ती आणि विश्वासाचा तसेच मानवता कार्य करणारा परिसर म्हणून ओळखला जातो सर्व जात व धर्माचे नागरिक एकटीच्या स्वरूपात राहून वेगवेगळ्या भक्तिमार्गाने सर्वांना आनंद देणारा कार्यक्रम करत असतात श्री गजानन महाराज सेवा
समिती हे वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाला दिशा देणारे कार्य करीत असते व संत गजानन महाराजांना अभिप्रेत कार्य करून समाजाला अपेक्षित मार्गदर्शन करण्याचं काम करणारे सर्व पदाधिकारी यांचे त्यांनी कौतुक केले.
त्यावेळेस उपस्थित माधव मानकर, एडवोकेट देव आशिष काकड विवेक भरणे, जयंत मसने, पूर्व मंडळ अध्यक्ष श्री संदीप भाऊ गावंडे, सरचिटणीस विठ्ठल देशमुख,शंकर भाऊ कपले, सुधीर भाऊ गावंडे, सत्यविजय जळमकर, सोनू बाभुळकर, नरेंद्र दिंडोकार, प्रशांत सपकाळ , विकी काळे, व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..