ब्रम्हपुरी:-
राज्यातील ओबीसी,व्ही जे एन टी, एस बी सी मधील अनेकांना केंद्र व राज्य सरकारने अनेक निर्णयामुळे दिलासा मिळाला असून अजूनही ओबीसीचे अनेक गंभीर प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यांच्या सोडवणुकी साठी समाजाकडून योग्य पाठपुरावा व योग्य सादरीकरण होणे आवश्यक आहे व यासाठी।ओबीसी समाज सतर्क व जागृत असणे अत्यावश्यक आहे असे मौल्यवान प्रतिपादन राज्य मागासवर्गीय आयोग चे कार्यकारी अध्यक्ष माजी न्यायमूर्ती मा चंद्रलाल मेश्राम यांनी स्थानिक शिवाजी चौक येथील सार्व बांध विश्राम गृह येथे कार्यक्रम आयोजित ओबीसी च्या बैठकीत व्यक्त केले,
याप्रसंगी मा चंद्रलाल मेश्राम यांचे स्वागत प्रा प्रकाश बगमारे,राज्य कार्यकारीणी सदस्य, भाजपा ओबीसी मोर्च,निवृत्त प्राचार्य डॉ कोकोडे,माजी जी प उपाध्यक्ष तथा
जिल्हा महामंत्री माजी नगरसेवक कृष्णा सहारे ,माजी प्राचार्य भाऊराव राऊत ,प्रा अमृत नखाते,जगदीश पिलारे,नरू नरड यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री मेश्राम साहेब यांचे स्वागत केले .या प्रसंगी प्रा प्रकाश बगमारे ,डॉ कोकोडे,कृष्णा सहारे माजी जि प उपाध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री भाजप,भाऊराव राऊत ,प्रा दिवाकर पिलारे ,निवृत्त विस्तार अधिकारी राजू भागवत ,प्रा दिवाकर पिलारे, यांनी चर्चेत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात सहभाग घेतला.या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा डॉ अशोक सालोडकर,ओबीसी नेते तथा नगर महामंत्री मनोज भूपाल ,जगदीश पिलारे ,भाजप युवानेते सिद्धेश्वर भर्रे,व्यवसायी अमित मेंदुले,निवृत्त विस्तार अधिकारी राजू भागवत,प्रा दिवाकर पिलारे, शिवसेनेचे नरु नरड,बालू नवलाखे,गणेश पिलारे राऊत बाबूसाहेब आरोग्य विभाग,केवळराम पारधी,ऍड नागोसे,व तलमले दुधवाही ,पिलारे पारडगाव,व अन्य उपस्थित होते ,या बैठकीचे संचालन भाजपा ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा डॉ अशोक सालोडकर तर उपस्थित सर्वांचे आभार ओबीसी नेते तथा नगर महामंत्री मनोज भूपाल यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....