कारंजा (शहर प्रतिनिधी)
पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर हवाई हल्ले करून शेकडो आतंकवाद्यांचा खात्मा केला. सैन्याच्या या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कारंजा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचे मुख्य आकर्षण 100 मीटर लांब तिरंगा ध्वज होते. रॅलीला कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सुरुवात झाली. यामध्ये माजी सैनिक, देशभक्त नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, जानता राजा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुढे कूच केली. मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संपूर्ण रॅली दरम्यान "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम" च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड च्या हॉलमध्ये माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या रॅलीमध्ये आमदार सईताई डहाके, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे,नरेद्रगोलेच्छा तालुका अध्यक्ष अमोल ठाकरे, महाराष्ट्र बहुजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडुभाऊ इंगोले, डॉ. शार्दुल डोगगावकर, प्रज्वल गुलालकरी, शहराध्यक्ष प्राजक्ताताई माहीतकर, कौस्तुभ डहाके, डॉ. राजीव काळे, किरण चौधरी, महेद्र लोडाया विजय काळे, अमित संगेवार, नितीन गढवाले, संदीप काळे, सविज जगताप, संदीप बन्नोरे जिग्नेश लोडाया, सविताताई काळे, संदीप कुर्हे, अरविंद इंगोले प्रसन्ना पळसकर, विनीत गोलेच्छा, वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार,शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशालीताई येळणे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....