कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :- दिनांक १९ जुन ३०२३ रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांचा वाढदिवस कारंजात धुम धडाक्यात साजरा करण्यात आला. येथील विश्राम गृह येथे आमदार राजेन्द्र पाटणी यांनी प्रवेश करताच फटाके फोडून त्यांचे स्वागत जमलेल्या कार्यकर्त्यांनी केले. विश्राम गृह येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी, अधिकाऱ्यांनी आमदार राजेंद्र पाटणी साहेबांना शाल, श्रीफळ, हार, देत त्यांचे स्वागत केले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीलाराम पंजवाणी होते.विश्राम गृह येथील या कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांनी प्रास्ताविक करतांना आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांना दीर्घ आयुष्य चिंतले . भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात. येथे उपस्थित सर्व ग्रामीण व शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमदार साहेबांना पुष्प गुच्छ देवुन स्वागत केले , शुभेच्छा दिल्यात. भाजपा कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. उत्साही कार्यकर्त्यानी डी जे च्या गाण्यावर वाजवत, नाचत आपला उत्साह प्रगट केला. अनेकांनी यावेळी गाण्यावर नाचत आनंद व्यक्त केला. आमदार राजेंद्र पाटणी साहेबांचे सुद्धा यावेळी पाय थिरकले व ते सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर यात सामील झाले. आज कारंजा शहरातील आयोजित विविध भूमिपूजन स्थळी सुद्धा त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. त्यांचे स्वागत अनेक मान्यवर पासून सामान्य कार्यकर्त्यांनी केले. संचलन भाजपा तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे यांनी केले.असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे.