कारंजा : आद्यगोंधळी विर तानाजी मालूसरे या एकनिष्ठ शूर शिवभक्ताने हिंदवी स्वराज्याच्या स्वातंत्र्याकरीता इतिहास पूर्व काळात, स्वतःचे मुलाचे रायबाचे लग्न बाजूला सारून, कोंढाणा किल्ला सर करण्याची मोहीम आखून, गड ताब्यात घेत असतांना स्वतःच्या प्राणाचे बलिदान केले. आणि कोंढाणा किल्ल्यावर स्वराज्याचे - स्वातंत्र्याचे भगवे निशान डौलाने फडकवीले. शिवरायांना आद्य गोंधळी विर तानाजी मालूसरे शहीद झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या मरणोत्तर सन्माना करीता म्हणून "गड आला पण सिह गेला"याची याची स्मृती तेवत ठेवण्या करीता कोंढाण्याचे नामकरण "सिहगड" असे केले. त्यांचा स्मृतीदिन हा बलिदान दिन म्हणून साजरा केल्या जात असतो. त्या निमित्त शनिवारी, गोंधळी समाज संघटना, विदर्भ लोककलावंत संघटना आणि सा.करंजमहात्म्य परिवाराचे विद्यमाने, त्यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करीत, मानाचा मुजरा करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड प्रमुख उपस्थितीमध्ये पंजाबराव ठाकरे, साहित्यीक ओंकार मलवळकर, उमेश अनासाने हे होते. कार्यक्रमाला रोहीत महाजन, कैलास हांडे, कमलेश कडोळे, अशोक गोरडे, केशवराव पाटील राऊत, डॉ सौ ज्ञानदेवी गरड, ओम गरड, प्रकाश हांडे इत्यादिंची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे आयोजन संजय कडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहीत महाजन यांनी केले.