कारंजा (संजय कडोळे जिल्हा प्रतिनिधी) वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारताकडे पाहिले जाते अश्या बलाढ्य देशाचं नेतृत्व करण्याची संधी पंतप्रधान पदाच्या माध्यमातून राजीवजींना मिळाली आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन देशभर विज्ञान व तंत्रज्ञानाचे जाळे निर्माण केले त्याच बरोबर,अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे महासचिव या नात्याने देशभरात कांग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावले.अश्या दुहेरी जबाबदाऱ्या राजीवजींनी यशस्वी रित्या सांभाळल्या.आणि देशासाठी खुल्या मनाने सामान्य जनता जनार्दना मध्ये मिसळत सभा गाजविणाऱ्या या स्वाभिमानी अश्या कॉंग्रेसच्या नेत्याचे अखेर देशासाठी बलिदान झाले. अशा भारतरत्न स्व.राजीवजी गांधी ह्यांची जयंती निमित्त,कारंजा कांग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक शासकिय विश्रामगृह येथे रविवारी त्यांना अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन -आदरांजली सभेचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भोजराज हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ डोणगावकर होते.या सभेला वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा ॲड. संदेश जैन जिंतुरकर,वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी पंचायत राज विभागाचे अध्यक्ष अँड वैभव ढगे,शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गवई,एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष अक्षय बनसोड, कारंजा शहर सेवादलाचे अध्यक्ष अँड वैभव लाहोटी,शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफ जट्टावाले,जफर खान, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रदिप वानखडे,करण सोनोने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्व.राजीवजी गांधीच्या पतिमेचे हारार्पण करून अभिवादन केले.
यावेळी या अभिवादन कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन ॲड वैभव ढगे यांनी केले.