अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील डाळिंबी कोळंबी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत असलेल्या रॉयल धाब्या वर अनधिकृत रीत्या सुरु असलेल्या पेट्रोल व डिझेलची तस्करी करणाऱ्या माफियांकडून मुर्तीजापुर येथील दैनिक राजोन्नती, दैनिक सायरन, पब्लिक ॲप प्रतिनिधी अजय प्रभे यांच्यावर अमानुष हल्ला करुन अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. असुन सदर घटना ही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची मुस्कटदाबी करणे होय जे समाजात अशोभनीय आहे. करिता आम्ही अकोला जिल्हा महिला मुक्ती मोर्चा संघटना च्या वतीने निवेदन करण्यात येते की, सदर संबंधित पेट्रोल व डिझेल माफियांवर नव्याने राज्याच्या विधानसभेत पास गो झालेल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी व संबंधित पत्रकारांला न्याय मिळवून द्यावा अन्यथा महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक खरात, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा संगीता वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महिला निरीक्षका लक्ष्मीताई गावंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजकुमार वानखडे, जिल्हा संपर्कप्रमुख गणेश वाकोडे, मंगला दिडोकार,रजनी माथने,रंजीता सोनवणे, शोभा पालवे,देवकाबाई सोलकर,सजन पवार, रेखा भास्कर,मुक्ता सुरत्ने,प्रिया सोलकर, सावित्री भास्कर, रजनी सुरत्ने,शालीबाई सोलकर,मनाबाई बारे,जैनाबाई पालवे, गंगुबाई सुरत्ने,सुपडाबाई ठाकरे, देवानंद खिरकर, बबलू सुरत्ने,शुभम वाघ, राजेश सोसे, सैय्यद नुरा यांच्या सह असंख्य महिला मुक्ती मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते.