स्थानिक मलकापूर प्रभाग क्रमांक 14 हार्डवेअर समोर राजू काळे हे पाच वर्षापासून पाणपोईची मोफत सेवा देत आहेत. यावर्षी त्यांच्या या पाणपोईचे उद्घाटन अयोध्या येथील भागवताचार्य मार्कंडेयजी महाराज त्यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे , समाजसेवक गजानन हरणे, विभाग प्रमुख प्रमोद धर्माळे, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश काळंके यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी भूषण काळे, विनोद वानखडे, अजिंक्य वाघमारे, राठोड गुरुजी यांच्यासह परिसरातील बरेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार आयोजक राजू काळे यांनी.