चंद्रपूर : काल प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपनू सायंकाळच्या सुमारास पोहण्याकरीता गडचांदूर शहरालगतच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने (Ultratech Cement Company) खोदलेल्या एका खोल खड्यात (deep rock) तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू (Three school children drowned) झाल्याची घटना काल गुरूवारी सायंकाळी 6 वाजताचे सुमारास उघडकीस आली होती. दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदिपे व अर्जून सिंह असे मुलांचे नाव आहे. तिघेही अल्ट्राटेक कंपनी वसाहतीत कर्मचाऱ्यांची मुले आहेत. कंपनीच्या खड्याजवळ त्या मुलांचे कपडे आढळून आल्याने त्यांचा खड्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यापैकी आज शुक्रवारी सकाळी तिघांचेही मृतदेह आढळून आले आहेत.
कोरपना तालुक्यकात (Korpana) गडचांदूर (Gadchandur) शहराजवळ अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कार्यरत आहे. याच कंपनीच्या आवारात कंपनीने मोठमोठ खड्उे खोदले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असते. शिवाय खडडेही खोल आहेत. काल प्रजासत्ताक दिवस असल्याने सकाळी घ्वाजारोहण पार पडले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास बारा वर्षाखालील तीन मुले दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदिपे व अर्जून सिंह हे पोहण्याच्या उदेश्याने गेले. पोहताना त्यांना खोल खड्डयांचा अंदाज न आल्याने ते पाण्याने तुडूंब भरलेल्या खड्यसात बुडाले.
अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील असल्याने ते घरी लवकर परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बद्दल विचारपूस करण्यात आली. शोधाशोध करण्यात आल्याोहने तिन्ही मुलांचे सायंकाळच्या सुमारास त्या खड्याजवळ कपडे आढळून आल्याने तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. काल रात्र झाल्यामुळे त्यांचा मुलांचा शोध घेता आला नाही. आज पुहा शोध मोहीम सुरू करून सकाळी दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदीपे, अर्जुन सिंह या तिघांचे मृतदेह आढळून आले.
त्यांचा मृतदेह गडचांदूर पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरीता गडचांदरू ग्रामीण रूग्णालया पाठविला. तिन्ही मुले हे अल्ट्राटेक कॉलनीतील कर्मचाऱ्यांची आहेत. या घटनेमुळे गडचांदूर अल्ट्राटेक वसाहतीत शोकळा पसरली आहे.