विद्यार्थी दशेत वावरताना अनेक समस्या उद् भवतात.पदवी हातात आली की,काय करावे काही सूचेनासे होते, अशावेळी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा असे वाटते.आवडीने एखादा उद्योग करायचा असेल तर काही युक्त्या अवलंबून अमलात आणाव्या लागतात.यासाठी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करतो.तोच यशाचे उंच शिखर सर करित असतो असे विचार प्रसिद्ध उद्योजक रवी आष्टेकरने व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर उद्घाटक चंद्रपूर- गडचिरोली राईस मिल संघटनेचे अध्यक्ष श्री.अजय भट्टड हे होते.प्रमुख उपस्थित डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे विचारपिठावर उपस्थित होते. यावेळी अजय भट्टड म्हणाले,की आम्हाला व्यवसाय करतांना खूप वेळा अडचणी येतात परंतु त्यावर मात करणे हे मोठे स्कील असते.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्यांनी उद्योग जमला तर तो व्यक्ती नोकरदारापेक्षा समोर जाऊन आपली आर्थिक उन्नती साधू शकतो,असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बी. एल. लेनगुरे, संचालन प्रो.बी जी दमकोंडवार यांनी तर आभार प्रा जयेश हजारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी डॉ विवेक नागभिडकर, प्रा. आकाश मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला डॉ धनराज खानोरकर, डॉ किशोर नाकतोडे, डॉ सुनिल चौधरी, प्रा मिलिंद पठाडेसह अनेक विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते