कारंजा:-कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे चिरंजीव ज्ञायक पाटणी
यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीषजी महाजन यांच्या कडे मतदार संघातील रस्ते दर्जोन्नती करण्यासाठी सुचविले होते. या कामास प्रशासकिय मान्यता देण्याबाबत ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदार संघातील कारंजा मानोरा तालुक्यातील खालील प्रमाणे रस्त्यांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी मतदार संघात नविन रस्त्यांच्या लिंक जोडल्यात, मोठया प्रमाणात नविन रस्ते केलेत. जेथे रस्ते नव्हते तेथे नविन रस्ते केलेत. दहा ते पंधरा वर्षापू्वी मोठ्या प्रमाणात पाटणी साहेबांच्या पुढाकाराने झालेल्या शेकडो किलोमीटर रस्त्यांपैकी काही रस्ते खराब झाले होते, खड्डे पडले होते. हे खराब झालेले रस्ते सुधरावे,
परत खराब होणार नाही यासाठी नविन सिमेंट काँक्रिटचे रस्ते तिथे तयार व्हावे यासाठी प्रयत्न केलेत जेणे करून रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत आणि आमदार राजेंद्र पाटणी यांनी पूर्वी केलेले हे रस्ते कायम टिकावू राहतील.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ज्ञायक राजेंद्र पाटणी यांची रस्ते दर्जोन्नती ची मागणी मंजूर केली असून विकासाकरीता असणारी धडपड आणि ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्याशी असणारी त्यांची जवळीक लक्षात येते. ज्ञायक पाटणी यांच्या मागणीची दखल घेत कारंजा मानोरा तालुक्यातील अंदाजित ४८ कोटी १४ लक्ष किंमतीच्या रस्ता दर्जोन्नतीच्या कामास प्रशासकिय मान्यता प्राप्त करुन दिली. या शासन निर्णयानुसार कारंजा मानोरा तालुक्यातील एकूण ४०की.मी. लांबीचे रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे.
कारंजा मानोरा तालुक्यातील रस्त्यांची दर्जॉन्नती /सुधारणा करण्याची साठी ज्ञायक पाटणी यांचे प्रयत्न फळास आले असुन खालील रस्त्यांची दर्जोन्नती, सुधारणा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
दिनांक १८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग , मंत्रालय मुंबई यांनी शासन निर्णय क्रमांक मुग्रायो २०२४/प्र. क्र.३४१/बांधकाम-४ नुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २(बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय पारित केला असुन त्यात कारंजा मानोरा मतदार संघातील कारंजा व मानोरा तालुक्यातील या कामांचा समावेश आहे. मतदार संघातील या कामांची अंदाजित किंमत ४६ कोटी ३ लक्ष ९८ हजार रूपये असून १०
वर्ष देखभाल दुरुस्ती करीता २ कोटी १० लक्ष ८७ हजार असे एकूण ४८ कोटी १४ लक्ष ८५ हजार आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.माळेगाव ते अंबोडा रस्ता (MRL ०२) लांबी ६ .१०० कि. मी.अंदाजित किंमत ७७८.४८ लक्ष, १०वर्ष देखभाल दुरुस्ती अंदाजित ३८.९२लक्ष रूपये,सिंगडोह ते बोरव्हा रस्ता (l-५३,VR-०२) लांबी ३.७०० अंदाजित किंमत ४५०.६०लक्ष,१०वर्ष देखभाल दुरुस्ती अंदाजित २०.१३लक्ष रूपये,रामा २७३ते भिलडोंगर शेंदुरजना रस्ता(MRL- ०४ VR -८८) लांबी ५.५०० , अंदाजित किंमत ५७२.४५ लक्ष ,१०वर्ष देखभाल दुरुस्ती अंदाजित २५.५२ लक्ष,उंबर्डा ते झोडगा रस्ता (TR-१८,VR-६८) अंदाजित लांबी ९.७६०, अंदाजित किंमत १०७४.६९ ,१०वर्ष देखभाल दुरुस्ती अंदाजित४९.०५ लक्ष रूपये,
पोहा ते कोळी रस्ता (MRL- ११,VR -१९३) लांबी ५.३००, अंदाजित किंमत ५६४.६१लक्ष,१०वर्ष देखभाल दुरुस्ती अंदाजित२४.९१ लक्ष,रामा २११ते एकलारा रस्ता (L २९VR-४०), लांबी ४.२०० , अंदाजित किंमत ५०४.३३ लक्ष,१०वर्ष देखभाल दुरुस्ती अंदाजित२२.८४ लक्ष,वटफळ ते कुंभीरस्ता(LR-१४,ODR-५५) लांबी ५.७००की मी, अंदाजित किंमत ६५८.९१,१०वर्ष देखभाल दुरुस्ती अंदाजित२९.५०लक्ष,
सदर कामे ग्राम विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण संस्थेमार्फत , प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर व ग्राम विकास विभागाच्या शर्ती वर करण्यात यावीत असे आदेशात नमूद आहे ज्ञायक पाटणी यांनी मतदार संघातील सुचविलेल्या अंदाजित ४८कोटी १४ लक्ष किंमतीच्या रस्ता दर्जोन्नतीच्या कामास प्रशासकिय मान्यता प्राप्त झाली आहे .असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....