नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत नागभिड शिवनगर येथील रहिवासी यांनी एका अल्पवयीत मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या मुलाची चंद्रपुर कारागृहात रवानगी केली,
नामे लिलाधर उफॅ दादु चंद्र ज्योती लांजेवार वय 21वर्ष असे आरोपीचे नाव असुन आरोपी हा पिडीत मुलीच्या घरी अधुनमधून जात असायचा, दिनांक 10/7/2022 सांयकाळी मुलीच्या घरी गेला असता पिडीत मुलीच्या आईने त्याला घरी भाजी बनविण्याकरीता दुकानामधुन अंडे घेवून आणण्यासाठी सांगीतले तर मुलीला सोबत दुकानात नेतो असे दोघेही दुचाकीने घरुण निघुन गेले
दरम्यान गोवा काॅलेज परीसरात त्याने दुचाकी वळवून गोवा काॅलेज परीसरात त्याने त्या मुली सोबत जबरजबरीने अतिप्रसंग केला,पिडीत मुलगी आरोपी मुलाच्या तावडीतून सुटून घरी आली व घडलेला प्रकार आईजवळ कथन करुण सांगीतला ,
लगेच आई सरळ नागभिड पोलीस स्टेशन ला येवून वरील आरोपी बाबत माहिती दिली,व तक्रार दाखल केली,सदर तक्रारीवरुण पोलीसांनी आरोपी चा शोधाशोध करुण अवघ्या 30 मिंनीटात आरोपी पकडण्यात पोलीसांना यश आले, कलम 354, 376 सोबत विविध कलमनव्ये गुन्हा नोंदवून आरोपी ला न्यायालयत हजर करुण न्यायालयीन कस्टडी दिली,राञो उशिरा पर्यंत आरोपीनां चंद्रपुर कारागृह तो रवानगी केली,नागभिड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा, राजुजी मेंढे साहेब से नेहमी जनतेसोबत मिळुन राहुन राञोला गस्त मध्ये पायदळ फिरुण संपुणॅ परिसर पिजूंन काढीत असतात, संध्याच्या परिस्थितीत चोरीचे प्रमाण कमी झाले, त्याबद्दल त्यांचे व सहकारी चे नागभिड वाशिय जनतेकडुन अभिनंदन केले जात आहे,