या जगात सर्व काही सापडेल,पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही. पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसा पासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल.म्हणून चालतांना "पाऊल",बोलताना "शब्द" बघताना "दृष्टी ",आणि ऐकताना "वाक्य " या चार गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर राजकारणात वादळं निर्माण होणारच नाहीत.! तुम्ही मनापासून "इतरांच भलं व्हावं " ही इच्छा जर मनात आणली तर सुख तुमच्या दारी पाणी भरेल. परंतु वाशीम जिल्ह्यात, खऱ्या खुऱ्या हाडाच्या नाट्य कलाकारांऐवजी -भजनी कलावंत महिला व पुरुष मंडळींना,शाहिर,लोककलांवत यांना, गरज नसतांना राजकारणातील राजकिय कार्यकर्ते असलेल्या व्यक्तिंना,केवळ आपल्या जातीधर्माच्या व्यक्ती आहेत म्हणून त्यांना,शहरातील डॉक्टर्स मंडळी,मंदिरांचे विश्वस्थ किंवा पुजारी यांना,त्यांचा नाट्यक्षेत्राशी काडीचाही संबंध नसतांना, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्यत्व मोठ्या उदार अंतःकरणाने बहाल करण्यात आले.भजनी कलावंत महिला पुरुष व लोककलावंत यांना तर अ.भा.नाट्य परिषद सभासदत्व घेतल्याखेरीज तुम्हाला, शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे,वृद्ध साहित्यीक कलाकार मानधनच मिळणार नाही.अशी भिती किंवा खोटे आमिष दाखवून अ.भा.नाट्य परिषदेचे सदस्य बनविण्यात आले असल्याचे वृत्त असून,आपली फसवणूकच झाल्याचे जिल्हयातील कलावंत सांगतात.शिवाय अनेक कलावंत सांगतात की,आम्ही नाट्य परिषदेच्या सदस्यत्वाकरीता आजिवन वर्गणी दिली आहे.परंतु आम्हाला अद्यापपर्यत सदस्यत्वही मिळाले नाही.सन २०२३ ते २८ या पंचवार्षिक निवडणूकी करीता होऊ घातलेल्या निवडणूकीच्या मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांचे नाव नाही आणि त्यांना मानधनही सुरु झालेले नाही.
वास्तविक पहाता साहित्यिक,कवी,गायक,वाद्य वाजविणारा कलाकार,शाहिर, भिमशाहिर,किर्तनकार,भजनी कलाकार,व पुरातन आणि ऐतिहासिक लोककला जपणारे लोककलाकार यांच्याकरीताच, शासनाने सांस्कृतिक विभागामार्फत,जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व पालकमंत्र्यांच्याद्वारे गठीत, जिल्हा निवड समितीच्या अशासकिय सदस्याद्वारे, लोककलाकारांना शासनाकडून मानधन मंजूर केले जाते.व त्यासाठी लाभार्थ्यांना,अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई या पूर्णतः खाजगी असलेल्या संस्थेच्या सदस्यत्वाची कोणतीही गरज किंवा आवश्यकता नाही.व शासनाची अट तर मुळीच नाही. कारण नाट्यक्षेत्र असो किंवा चित्रपटकलाक्षेत्र असो.हे लोककलेपासून पूर्णत: वेगळे क्षेत्र असून,नाट्यकला क्षेत्राच्या मोठमोठ्या वेगळ्या संस्था कार्यरत असून,त्यांचे कलाकार हे तळागाळातील दारिद्रय रेषेखालील असूच शकत नाहीत. शिवाय त्यांचे करीता मोठमोठी आर्थिक महामंडळे,चित्रपट महामंडळे कार्यरत असतात. त्यामुळे नाट्य परिषदे करीता कार्य करणाऱ्या सदस्यांनी,नाट्यकलेशी व नाट्यक्षेत्राशी काडीचाही संबंध नसणाऱ्या व्यक्तींना,खोटी आश्वासने देवू नयेत.बळजबरीने सदस्यत्व बहाल करू नये व अखील भारतिय नाटय परिषदेत खोगीर भरती करू नये.तसेच सच्च्या नाट्य कलावंताला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे.आज संपूर्ण वाशिम जिल्हा नाट्य चळवळीपासून पूर्णपणे अलिप्तच राहिलेला आहे.येथे नाट्य क्षेत्राच्या विकासाकरीता, नाट्यशाळा नाहीत.नाट्य स्पर्धा होत नाहीत.नाट्य प्रयोग होत नाहीत.नाट्य कला मंदिर किंवा मंगरूळपिरचा अपवाद सोडला तर तालुका जिल्हा पातळीवर नाट्य सभागृहे सुद्धा नाहीत. त्यामुळे नाट्य कलाकारासोबतच सातत्याने नाट्यकला रसिक व श्रोत्यांची वाशिम जिल्ह्यात उपेक्षाच होत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....