महिला व बालकल्याण 10% जिल्हा परिषद सेस फंड जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत बाल विकास प्रकल्प कार्यालय नागभीड द्वारा नागभीड तालुक्यातील महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण दिनांक 22 मार्च 20 22 ला रुक्मिणी सभागृह नागभीड येथे सम्पन्न झाले. तेंव्हा सदर कार्यक्रमाला तालुक्यातील महिला सरपंच उपसरपंच व महिला ग्रामपंचायत सदस्य , माजी जी.प.व प.स.सदस्य ,पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका हजर होते. पंचायत समिती नागभीड व बाल विकास प्रकल्प कार्यालय नागभीड च्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित
मा.सौ रागिनीताई गुरपुडे माजी उपसभापती , श्री संजयजी गजपुरे माजी जि. प. सदस्य, श्री खोजराजजी मरस्कोल्हे माजी जि. प. सदस्य , सौ नयनाताई गेडाम माजी जि प सदस्य ,सौ सुषमाताई खामदेवे माजी प.स. सदस्य ,सौ रंजनाताई पेंदाम माजी प. स. सदस्य यांचा शाल व श्रीफळ देऊन तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त सौ योजना सलामे पर्यवेक्षिका, सौ पल्लवी ठाकरे अंगणवाडी सेविका नागभीड व सौ रीना इरपाते मदतनीस कोरंबी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक म्हणून मा. प्रणाली खोचरे गट विकास अधिकारी नागभीड ,मा. डॉ. विनोद मडावी तालुका वैद्यकीय अधिकारी नागभीड,मा. चिलबुले साहेब गटशिक्षणाधिकारी नागभिड, मा.सौ गीताताई जांभुळे आरंभ, मास्टर ट्रेनर, मा.नितीन वाघ , संरक्षण अधिकारी नागभिड, मा.राजेंद्र ठोंबरे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागभीड यांनी व उपस्थित सन्माननीय माजी जि. प.सदस्य व माजी प.स.सदस्य यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना कुपोषण, महिला प्रतिनिधींचे अधीकार व कर्तव्य, कौटुंबिक हिंसाचार, आरंभ बाळाचे सुरवातीचे क्षण मोलाचे, स्त्रियांचे आरोग्य, महिला,बालके व किशोरी मधील रक्तक्षय यावर मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमांमध्ये जागतिक जल दिन अंतर्गत सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे आयोजन श्री राजेंद्र ठोंबरे बाल विकास प्रकल्प अधीकारी नागभीड यांनी तर संचालन श्रीमती विभावरी तितरे सहा.ब.वि.प्र. अ नागभीड व आभार प्रदर्शन श्रीमती शिला गेडाम पर्यवेक्षिका नागभीड यांनी केले.