वाशीम - भारत देशातील ३२ राज्यांमध्ये ५६७ जिल्ह्यांमध्ये भारतीय युवा मोर्चा हे सामाजिक (एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेनटी, अल्पसंख्यांक) ८५ टक्के बहुजन समाजाची संघटना म्हणून नावारूपात आलेली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ई व्ही एम वापर २००४ पासून सक्रिय भारत देशात सुरू आहे त्याची इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात भारतीय युवा मोर्चाने शुक्रवार, १६ फेब्रुवारीला देशव्यापी हस्ताक्षर अभियान आंदोलन पुकारले आहे.
पत्रकात नमूद आहे की, टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर असलेल्या देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर निर्बंध लावलेले आहेत. ३.५% अल्पसंख्यांक असलेल्या ब्राह्मण समाजाच्या राष्ट्रीय स्तरावर काम करत असलेल्या पार्टी यांचा जनाधार कमी होत असल्याकारणाने ईव्हीएमची मदत ते घेतात. ईव्हीएमच्या बाबतीतला ८ ऑक्टोंबर २०१३ चा सुप्रीम कोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्ट आणि भारतीय निवडणूक आयोग यांचा मॅनेजमेंट, भारतीय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जुन्या ईव्हीएम मशीनचा वापर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला विवीपीएटी मशीन न लावण्यात आल्या व त्यात गडबड घोटाळा झाला याचे पुरावे, ईव्हीएम गडबड घोटाळ्याला जाणीवपूर्वक तसेच ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नवे नियम बनवले, निवडणूक निर्णय आयोगाच्या विरोधात बामसेफ या संघटनेची कोर्ट केस, २०१९ मध्ये बीजेपीने लोकसभा निवडणुकीत सगळ्यात मोठा घोटाळा केला, बीजेपीद्वारे निवडणुकीवर करोडो रुपयांचा खर्च असे एकूण वीस मुद्द्यांवर भारतीय युवा मोर्चाचे आंदोलन होणार आहे अशी माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. हस्ताक्षर अभियान आंदोलन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दहा ते पाच या वेळेत होणार आहे. आंदोलनाला शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, बेरोजगार, पेन्शनर, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच ८५ टक्के बहुजन समाजातील लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन भारतीय युवा मोर्चा तर्फे करण्यात आलेले आहे.