कारंजा (जिल्हाप्रतिनिधि संजय कडोळे)- येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी, येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन नवागत विद्यार्थ्याचे स्वागत करून मोफत शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक सत्र 2023-24 ची आज मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करन्यात आला.सर्व विद्यार्थ्याना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करन्यात आले त्यानंतर ईयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व नवागतांना शासना कडून पुरविन्यात आलेले पुस्तके देण्यात आलेत.शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना विद्यार्थी जीवनात पुस्तकाचे महत्व, इयत्ता आठवीच्या नवीन पुस्तकाची रचना कशी आहे याबाबत माहिती सागुन सेतु अभ्यासक्रमा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनी ओलिवकर, गोपाल काकड,अनिल हजारे तर देविदास काळबांडे,भालचंद्र कवाने,राजू लबडे, राजेंद्र उमाळे,राजेश लिंगाटे आदि शिक्षकेत्तर कर्म.उपस्थित होते.