भारतीय जनता पक्ष ब्रह्मपुरी च्या वतीने भाजपा कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या फोटोचे पूजन माल्यार्पण आणि वंदन ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले. यावेळी संबोधित करताना अतुल भाऊ म्हणाले की, साठ वर्षांपूर्वी एकात्म मानववादाची संकल्पना भारतात रुजविणारा नेता म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांची ओळख आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नंतर सोळा वर्षांच्या परिश्रमातून जनसंघाची उभारणी केली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला एकात्म सर्वात्मवादाचा सिद्धांत दिला, ज्याला भारतीय जनता पक्ष आज आपली विचारधारा मानतो. मोदी सरकारच्या योजनांमध्ये सर्वात्म एकात्मवादाचा विचार केलेला आहे."सबका साथ सबका विकास"हा एकात्म मानववादाचीच संकल्पना आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अपेक्षित विचारांवर आधारित समाजकार्य करावे असे आवाहन माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी केले.
यावेळी भाजपा जेष्ठ नेते प्रा.कादर शेख, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे,शहराध्यक्ष इंजिनीयर अरविंद नंदुरकर,युवा नेते साकेतभाऊ भानारकर भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर, प्राचार्य सुयोग बाळबुद्धे शहराध्यक्ष भाजयुमो,डॉ. प्रा.अशोक सालोटकर, शहराध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, सौ वंदनाताई शेंडे जिल्हा उपाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा, मंजिरी राजनकर,विक्रम कावळे शहर महामंत्री, राजू भागवत महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा,द्यानेश्वर पाटील दिवटे महामंत्री भाजपा प्रा.यशवंत आंबोरकर महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी, इंजिनियर अविनाश मस्के महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी, स्वप्निल अलगदेवे शहर महामंत्री भाजयुमो,अनिल तिजारे सरपंच, राजेश्वर मगरे तालुकाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी ललीत उरकुडे,किशोर बावनकुळे, उत्तम उरकुडे, सुभाष सहारे अरुण भगत,सुरेश बनपुरकर इ.उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर यांनी केले.याक्षणी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.