वैनगंगा विद्यालय कोलारी ता. ब्रम्हपुरी येथे सामाजिक वनीकरण विभाग, नागभीड अंतर्गत दिनांक ७/०७/२०२२ रोज गुरुवारला वनमोहोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला वन परिक्षेत्र अधिकारी श्री. आकाश विनोद सोंडवले व वनरक्षक श्री. नरेश दादाजी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व वनमोहोत्सवाचे महत्व पटवून सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या अवचीत्ताने शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय सखाराम दाते जेष्ठ शिक्षक श्री. योगेशकुमार नागपुरे, शिक्षिका कु. कल्पना कोल्हे, कु. गयावंता प्रधान, सुधीर पिलारे सरपंच बेलगाव, आरतीदास अवसरे तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.