कारंजा (लाड) स्थानिक विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा संत गाडगे बाबा विचार मंच बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे यांची एकमेव कन्या कु.मयुरी संतोष धोंगडे हिने अकाऊंटिंग ॲन्ड ऑफिशीयल मॅनेजमेंट विषय घेऊन इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेत 73.50 % गुण मिळवून प्राविण्य मिळवीले आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद व आई वडिलांना दिले आहे.कु.मयूरी धोंगडे हिचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.