प्राप्त माहिती नुसार ,सविस्तर वृत्त असे की सायंकाळी वेळ ६ : १० मि. सुमारास, स्थानिक बायपास किन्ही रोड, प्रशांतनगर येथील धामणी खडी येथील आरोग्य केन्द्रात कार्यरत असलेले, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र गणेश बाजड वय ३० वर्ष यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन घटनेचा आढावा घेऊन त्यांनी शव पोष्टमार्टमकरीता, श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. पुढील तपास शहर पोलीस स्टेशन कारंजाचे पोलिस अधिकारी करीत आहेत.