सध्या बिहार राज्यात राज्य शासनाच्या वतीने ओबीसींची जातनिहाय जणगणना सुरू आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुध्दा ओबीसींची जातनिहाय जणगणना करण्यात यावी यासाठी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
जणगणनेची आकडेवारी ही राज्याच्या विकासासाठी आवश्यक आहे. मात्र जणगणना करणे हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. मात्र केंद्रशासनाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ओबीसींची जातनिहाय जणगणना करण्यात येणार नाही असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राज्यशासनाने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात जातीनिहाय जणगणना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतांना ९ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जातीनिहाय जनगणनेचा ठराव मांडला होता. त्या ठरावाला काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह सर्व पक्षांनी एकमताने विधानसभेत मंजूर केला होता. त्याची अंमलबजावणी शिंदे- फडणवीस सरकारने त्वरित करावी असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगरपरिषदेचे नियोजन सभापती महेश भर्रे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, नगरसेविका लताताई ठाकुर, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष जगदीश आमले, काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके, ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष गुड्डू बगमारे, सरपंच सुरेश दुनेदार, ब्रम्हदेव दिघोरे, शिवाजी नखाते, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार यांसह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.