अमरावती विधान परिषद निवडणूकांमध्ये गेल्या वेळी पदविधर आमदार म्हणून निवडून गेलेले, हाडाचे डॉक्टर आ.डॉ.रणजित पाटील हे उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांचे जीवलग मित्र म्हणून ओळखले जातात. जीवाभावाचे मित्र असल्यामुळेच २०१४ - १५ च्या विधानसभा निवडणूकीत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडताच, नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या मित्राकडे हाडाचे डॉक्टर रणजित पाटील यांचेकडे कोणत्याही सभागृहाचे सदस्यत्व नसतांनाही, महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली होती. आणि आ. रणजीत पाटील यांनी सुद्धा ती सांभाळली होती. त्यानंतर ते निवडणूकीला सामोरे गेले. त्यावेळी त्यांची झुंज नुटा संघटनेच्या सलग २५ वर्षे आणि ५ वेळा विधान परिषद राहिलेल्या मातब्बर आ .प्रा. बि.टी. देशमुख यांचेशी झाली होती . परंतु तेव्हा भाजपाची लाट आणि देवेन्द्रजींचा झंझावाती प्रचार प्रसार यामुळे रणजीत पाटील यांनी एक हाथी विक्रमी विजय मिळवीला होता. त्यांचा करिश्मा सतत दोन निवडणूकीत कायम राहीला. पुढे परंतु सन २०२३ च्या निवडणूकी पर्यंत, फाजिल आत्मविश्वास आणि कामाच्या व्यस्तस्तेमुळे त्यांचा पदविधर आणि शिक्षक मतदारांशी संपर्क तुटला. शिवाय त्यांच्या स्वतःच्याच गृह जिल्हयामधून त्यांना विरोध होऊ लागला होता. शिवाय जुन्या पेन्शन वर ठाम असणाऱ्या देवेन्द्र फडणवीस यांचेसह त्यांच्या भाजपाने घुमजाव केल्यामुळे शिक्षक पदविधरांमध्ये भाजपा विषयी कमालीची नाराजी प्रगट होऊ लागली व "एकच मिशन-जुनी पेन्शन"मोहिमेने जोर पकडला. त्यामुळे आ रणजीत पाटील यांना निवडणूक अवघड होणार असल्याचे चित्र अगोदच स्पष्ट दिसत होते. परंतु तरी सुद्धा आ रणजीत निर्धास्त होतो . ते बेसावध राहीले. त्यांना अतिविश्वास होता. आणि या अति विश्वासापायी त्यांनी आपल्या पदविधर मतदार संघात मतदाराशी तर सोडाच परंतु स्वपक्षाची स्थानिक नेते मंडळी, कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य, जि . प सदस्य, नगरसेवक, सरपंच, शैक्षाणिक संस्था, प्राध्यापक किंवा शिक्षक मंडळी कुणा कुणाशीही संपर्क आणि संवाद केलाच नाही. त्यामुळे त्यांच्या विश्वासातले पदाधिकारी कार्यकर्ते, जुन्या मतदारासह नवखे मतदार म्हणजे नव्याने नोंदणी झालेले पदविधर मतदार कोठेतरी दुखावले गेले. आमच्या माहिती प्रमाणे अनेक पदविधर "आम्हाला साहेबांकडून निराप किंवा एखादा फोन येईल काय ?" याची वाट बघत होते. इतर निवडणूकांपेक्षा ही निवडणूक काहीतरी वेगळी असावी. या निवडणूकीतून बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल काय ? शिक्षक प्राध्यापकांच्या वेतनाचे प्रश्न सुटतील काय ? जुनी पेन्शन योजना लागू करण्या बाबत उमेदवार निर्णय घेऊ शकले नाहीत. एवढेच काय विधान परिषदेत प्रस्ताव मांडू शकलेले नाहीत.आवाज उचलू शकले नाहीत. हे शल्य त्यांना त्रस्त करीत होते. परंतु तरीही पदविधर मतदारांच्या समस्याची दखल घेण्यात सत्ताधारी भाजपासह आ.रणजित पाटील स्वतः कमी पडले ही वस्तुस्थिती होती. तर या उलट मात्र अमरावती पदविधर मतदार संघातील नवखे असलेले, महाविकास आघाडीचे उमेद्वार धिरज लिंगाडे हे मात्र मित्रपक्षाच्या सहकार्यातून, पदविधर मतदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांना विश्वासात घेत होते. ठिकठिकाणी जाऊन, त्यांच्याशी संपर्क करून संवाद करीत होते. त्यामुळे अखेर अगोदरच महाविकास आघाडीने दर्शविलेला विश्वास हा सार्थ ठरलेला आहे. आणि मतमोजणीतील तब्बल तिस तासाच्या संघर्षानंतर अमरावती विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. नवनिर्वाचित विधान परिषद आमदार धिरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते तर भाजपाचे आणि शिंदे गटाचे मावळते आमदार रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मते पडली आहेत. पुढील वर्षी लोकसभेसह विधानसभेच्या सुद्धा निवडणूका होणार आहेत. शिवाय लवकरच स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणूका सुद्धा लागणार आहेत.परंतु त्यापूर्वी लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीच्या निकालात विदर्भातील भाजपाच्या नागपूर व अमरावती ह्या दोन्ही जागा गमविल्यामुळे देवेन्द्र फडणविस यांच्या विश्वासाला सुद्धा तडा गेला असून भविष्यातील सत्ता परिवर्तनाची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. असे वृत्त ज्येष्ठ विश्लेषक संजय कडोळे यांनी केले आहे.