कारंजा : श्री महाशक्ती मित्र मंडळ, बेंबळपाट कारंजाच्या श्री महाशक्ती गणेशोत्सव मंडळाला यंदा पन्नास वर्ष पूर्ण झाली असून, मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे विविध सामाजिक उपक्रमाची रेलचेल आहे . यंदा बेंबळ्पाटा मध्ये कालिया मर्दनाचा, मनमोहक देखावा साकारण्यात आला असून, कान्हा गणेशाच्या रुपात कालियावर स्वार होऊन डोहामध्ये फिरत आहे .
त्यामुळे देखावा बघण्या करीता दर्शनार्थीची अलोट गर्दी उसळत आहे असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेकडे मंडळाने कळविले आहे. शिवाय बुधवारी मंडळाकडून भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले अकोला येथील गणेडीवाल चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित अकोला सेंटर ब्लड सेटर व कम्पोनेन्ट युनिट अकोला यांनी रक्त संकलन केले असून वृत्त लिहणे होईपर्यंत - एकूण पंचावण्ण युवक युवती रक्तदात्यांनी रक्तदान केले असून आणखी रक्तसंकलन सुरु आहे . रक्तदात्यांचा आकडा शंभरपेक्षा जास्त जाणार असल्याचे मंडळाकडून कळविण्यात आले आहे . रक्तदात्यांना आकर्षक प्रमाणपत्रासह, छत्रपतींची प्रतिमा, श्री महाशक्तीच्या श्रीगणेशाचे कॅलेडर आणि आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येत असून, देखावा पहाण्यास येणाऱ्या दर्शनार्थिंना सुद्धा कॅलेडर भेट म्हणून देण्यात येत आहे . असे वृत्त प्रत्यक्ष हजर असलेले, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे . .