महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाशीम शाखा कार्याध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती वाशीम आणि नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे राज्य सहसचिव तथा शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले समाज प्रबोधनकार पी. एस. खंदारे यांचा वाढदिवस वाशीम येथील पद्मतिर्थ मोक्षधाम येथे तारीख तेरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पी.एस. खंदारे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमातून शाळा महाविद्यालयांमध्ये अभियान राबवित आहेत, सुमारे साडेतीन हजार गावांमध्ये पैदल जाऊन संत, समाज सुधारकांच्या विचारांची पेरणी सातत्याने सुरू आहे, मानसाच्या मनातील स्मशानभूमीत भुतांचे व मृत आत्मा वास करतो हि भावना नष्ट करण्यासाठी व जगात कुठेही भुत नसते कोणतीही जागा अपवित्र नसते, माणसाचं मन शुद्ध असावे लागते या उद्देशाने महाराष्ट्र अंनिस वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जेष्ठ विचारवंत मधुकर जुमडे,राजु दारोकार, निलेश भोजणे, हितेश दारोकार, जिल्हा कार्याध्यक्ष तथा पुरोगामी किर्तनकार हभप विजय शिंदे पाटील, जिल्हा प्रधान सचिव एड.सेवेंद्र सोनोने सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते, या वेळी विजय शिंदे,सेवेंद्र सोनोने,राजु दारोकार, मधुकरराव जुमडे, निलेश भोजणे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले व पी एस खंदारे यांच्या कार्याचा गौरव केला, वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु दारोकार यांनी तर आभार निलेश भोजणे यांनी केले.