कारंजा (लाड) : कारंजा शहरातील श्रीरामनवमी निमित्त होणाऱ्या जन्मोत्सवाच्या आयोजना करीता स्थानिक श्रीराम नवमी उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कारंजा आणि सर्व कारंजेकर हिंदू रामभक्तांची नियोजन बैठक गेल्या रविवारी दि १२ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाली. मंगेशभाऊ कडेल यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे दिलेल्या वृत्तानुसार बैठकीमध्ये वर्षप्रतिपदे पासून तर श्रीरामनवमी पर्यंतच्या श्रीराम जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये वर्षप्रतिपदा डॉ हेडगेवार जयंती निमित्त बुधवार दि २२ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता मोटार सायकल रॅलीचे आयोजन, गुरुवार दि २३ मार्च रोजी सकाळी ११ : ०० ते ०२:०० वाजेपर्यत, श्री झुलेलाल जयंती व श्रीराम उत्सव समितीचे माध्यमातून श्री झुलेलाल मंदिर सिधी कॅम्प कारंजा येथे रक्तदान शिबीर आणि सांयकाळी ०८:०० वाजता आर्ट ऑफ लिव्हींग सत्संग कार्यक्रम. ; शुक्रवार दि . २४ मार्च रोजी मोठे श्रीराम मंदिर येथे सायं ०५ :०० वाजता श्रीराम हरिपाठ मंडळ बेंबळा यांचा हरीपाठ त्यानंतर सायं . ०७:०० वाजता हभप विनायक महाराज गुंजाटे पिंपळगाव यांचे किर्तनाचा कार्यक्रम. ; शनिवार दि. २५ मार्च रोजी सायं ०७:०० वाजता हभप पांडूरंग महाराज जाधव वढवी यांचे श्री संत एकनाथांचे एकनाथी भारुडाचा विलोभनिय कार्यक्रम. ; रविवार दि.२६ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता, रोगनिदान आरोग्य शिबीर ; सोमवार दि २७ मार्च रोजी सांय . ०७ : ०० वाजता. व्याख्यात्या कु . साक्षीताई वाघमारे यांचे व्याख्यान ; मंगळवार दि.२८ रोजी सांय ०७:०० वाजता श्री गजानन महाराज भजनी मंडळ कारंजाचे भजनाला कार्यक्रम ; बुधवार दि २९ मार्च रोजी सांय . ०७:०० वाजता सुंदरकांड ; गुरुवार दि ३० मार्च रोजी दुपारी १२:०० वाजता श्रीराम जन्मोत्सव, दुपारी ०१:०० वाजता टाळ मृदंगाच्या निनादात, बॅन्डबाजा भजनी दिंड्या सह श्रीराम दरबारसह भव्य अशी प्रभू श्रीरामचंद्राची शोभायात्रा ; शोभायात्रेत श्रीरामदूत बजरंगबलीची २२ फुट उंचीची भव्य मूर्ती राहणार असून ही शोभायात्रा कारंजा नगरीतील प्रमुख मार्गाने नगरपरिक्रमा करणार आहे. सायकाळी श्रीराम मंदिर जवळ भव्य यात्रा भरणार असून श्रीराम नवमी निमित महाप्रसादाचे वितरण केले जाईल अशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन बैठकीत ठरविण्यात आलेले आहे.

सदर्हू बैठकीला विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष मंगेश कडेल, नितीन गढवाले, गणेश बाबरे, तेजपालसिंग भाटीया, आशिष तांबोळकर, आशिष गावंडे, गोपाल पाटील भोयर, संदिप गढवाले, सतिश मुंदे, राम देशमुख, कुणाल महाजन, अघम पाटील, ब्रिज वानखेडे, विक्की पहाड, चंद्रकांत रावळे, रघुनाथ वानखडे, समिर देशपांडे, अजय देवरणकर, आश्विन जगताप, अतुल धाकतोड, जिग्नेश लोढाया, काजे, रंजित, संदिप कुन्हे, सुरज डवले, अक्षय मंत्री, ओम चौधरी, सचिन काळे, अजय श्रीवास, मारोती, काण्णवजी, सुरज कवळे, मयूर रागवाणी, रोडे, दादाराव सोनिवाळ, रॉय व इतर रामभक्ताची उपस्थिती होती. असे वृत्त विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष मंगेश कडेल यांचेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....