कारंजा लाड: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुण्यतीथीचे औचित्याने गुरुदेव फाऊंडेशन अमरावती कडून जिल्हा सामान्य रुग्णालय ब्लड बँक अमरावती येथे दि . १८ जुलै रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले .
वृत्त असे की सिकलसेल व थॅलेसेमिया या आजाराच्या बाळाकरीता रक्त मिळावे या उदेशाने श्री गुरुदेव फाऊंडेशन अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कडू यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुण्यतीथीचे औचित्य साधत ब्लड बँकेचे समन्वयाने रक्तदान शिबीर १८ जुलै रोजी आयोजीत केले होते . शिबीराला रक्तदात्यांनी चांगला प्रतीसाद दिला . रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने व गरजु रुग्नांना रक्त मिळावे याच हेतूने रक्तदान शिबीराचे आयोजन असल्याचे गुरुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरविंद कडू म्हणाले . शिबीराचे उदघाटण करण्यासाठी अमरावती विद्यापीठ गाडगे बाबा अभ्यासिकेचे प्राचार्य डॉ दिलीप काळे उपस्थीत होते . गुरुदेव प्रतिष्ठानने रक्तदात्या कडून रक्त दाना द्वारा रक्त संकलन करून गरजू रुग्णांना मिळावे या सारखे
समाज उपयोगी काम हाती घेतल्या बद्यल अध्यक्ष अरविंद कडू यांचे कौतुक केले . या वेळी डॉ दिलीप काळे यांचे सह रक्त संकलन केंद्राचे वैभव ठाकरे; जनसंपर्क अधिकारी मिलींद तायडे; योगेश पानझाडे; सागर दामेकर; अरविंद कडू; हर्षल जवंजाळ इत्यादीची प्रमुख उपस्थीती होती . शिबीर यशस्वी करण्यास शुभम अग्रवाल; मयुर डोंगरे; गराडे; शुभम चवरे भुषण सावंगेकर यांचे सह गुरुदेव फाऊन्डेशनचे सदस्य यांनी सहयोग दिला . रक्तदात्यांचे गुरुदेव फाऊन्डेशनकडून आभार व्यक्त करण्यात आले .