अकोला जिल्हा व अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या अतिशय छोट्या धामणा बु. या गावातील सर्व सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले आदिवासी कोळी महादेव जमातीचे युवा पत्रकार पुर्णाजी निरंजन खोडके हे नाव कोणी ऐकले नसेल असे मला वाटत नाही.
मनुष्य हा नेहमीच आपल्या कर्तुत्वाने मोठा होतो त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चोहोट्टा बाजार परिसरातील युवा पत्रकार पुर्णाजी निरंजन खोडके या नावाचा अग्रक्रम लागतो.
समाजकार्याची आवड ही मनोमन आपल्या अंगी असावी लागते मग ते कोणतेही चांगले कार्य असो त्या मध्ये यश हे नक्कीच मिळते.
निस्वार्थी वृत्तीचे ,सामाजिक कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे युवा पत्रकार पुर्णाजी निरंजन खोडके यांना कोणावर अन्याय होत आहे आणि आपण मुंगगिळुन गप्प बसायचे हे त्यांना कधीच सहन होत नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकरीता व त्यांना योग्य न्याय देण्याकरीता त्यांचा जन्म झाला असे मानण्यास काही हरकत नाही.
स्थानिक ,तालुका , जिल्हा तसेच
राज्यपातळीवर अनेक सामाजिक प्रश्न सोडण्याकरिता ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
त्यांच्या या सामाजिक कार्याचा आढावा मी आपणापुढे थोडक्यात मांडू इच्छितो.
गांधीग्राम व अकोला ही एसटी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी, अपंग, वृद्ध इत्यादींना आपल्या योग्य स्थळी जाण्यायेण्या अनेक अडचणींना सामना करावा लागत असे जेव्हा पत्रकार खोडके यांचे हे लक्षात आले. त्यावेळेस त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रांमधून या बाबत माहिती देऊन संबंधित विभागामध्ये लेखी स्वरुपात तक्रार दाखल करून सतत पाठपुरावा केला, आवाज उठवला, शेवटी संबंधित विभागाला ही सेवा सुरु करावी लागली.
माझ्या मते ही एसटी बस सेवा सुरू करणारे ते पहिले व्यक्तिमत्व असं म्हणने वावगे ठरणार नाही.
संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विद्यार्थी प्रश्न चोहोटा ते करतवाडी रेल्वे वा धामण बु.रोड असो तसेच
अकोला चोहोट्टा बाजार ,पारळा, भांबेरी तेल्हारा हया एसटी सेवा त्यांनी पाच महिन्यापासून बंद असलेली,वारंवार संबंधितो विभागाकडे पाठपुरावा करून हे प्रवासाचे अति महत्त्वाचे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न त्यांनी निकालात काढले.
पिक विम्याला मुदतवाढ मिळावी म्हणून त्यांनी माननिय मुख्यमंत्री , माननीय कृषिमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला कृषीमंत्री माननीय धनंजय मुंडे साहेबांनी पूर्णाजी खोडके यांच्या या मागणीची दखल घेऊन या योजनेला मुदतवाढ दिली. अखेर पत्रकार पूर्णाजी खोडके यांच्या या मागणीला यश आले.
आपल्या लेखणीच्या माध्यमातून व सामाजिक भावनेची जाणीव ठेवून त्यांनी शेतकरी ,शेतमजूर यांच्या हितकरिताचे अनेक प्रश्न त्यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून निकालात काढले, जसे की अतिवृष्टी प्रश्न असो ,कोरडा दुष्काळ असो, घरकुल बांधकामा करिता वाळू उपलब्ध करून देणे ,घरकुल अनुदानामध्ये वाढ करण्याचा प्रश्न इत्यादी.
करतवाडी रेल्वे स्टेशन थांबा ,या प्रश्न रेल्वे मंत्री व इतर वरिष्ठांन कडे मांडूंन धरला आहे.. या ठिकाणांची दखल घेऊन वरिष्ठांनी पाहणी सुद्धा केली आहे.तसेच छोटे मोठे वर्षानुवर्षे रघडलेली सर्व कामे या सामाजिक युवा पत्रकाराने केली..
ही सर्व सामाजिक कामे करत असताना या युवा पत्रकाराने हा अमूक जातीचा हा तमुक जातीचा हा जवळचा हा परका असा भेदभाव कधीच केला नाही.
या पत्रकाराने सर्वांना सोबत घेऊन हे सामाजिक कार्य केले तेही निस्वार्थीपणा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन म्हणून त्यांच्या प्रत्येक कार्यात यश मिळत गेले.
बर हा! युवा पत्रकार कोरोना काळामध्ये सुद्धा गप्प बसला नाही .अनेक गरजूंना त्यांनी अशा या कठीण परिस्थितीमध्ये सहकार्य केले.
युवा पत्रकार पुर्णाजी खोडके हे एक आगळे वेगळे रसायन सत्याकरता ना कुणाला घाबरायचं ! ना कुणाच्या धमक्यांना भीक घालायची
अगदी साधीसुधे राहणे विचारमात्र उच्च .
हे कमी वयात कसं काय जमलं हे त्यांच त्यांनाच माहीत.
हे सर्व करत असताना
हे व्यक्तिमत्व अनेक समाज उपयोगी संस्थेचे नेतृत्व करते जसे की प्रदेशाध्यक्ष विदर्भ युवा रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,
भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे माजी जिल्हाप्रमुख, केंद्रिय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली विदर्भ मिडिया प्रभारी,व ग्रामीण पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख,
अनेक न्यूज चॅनलचे प्रतिनिधी चे काम त्यांनी केले तसेच सध्या ते दिव्य मराठीचे प्रतिनिधित्वाचे यशस्वीरित्या काम करीत आहेत.
त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेतली अनेक शासकीय निम शासकीय अधिकारी तसेच जमातीच्या विविध संघटना व इतर संघटनेचे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
शेतकरी ,शेतमजुर गोरगरीब, विद्यार्थी ,अनाथ, वृद्ध,माता भगिनी व जनतेच्या आवश्यक समस्या यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा योग्य वापर केला व विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून अन्याय होत असलेल्या जनतेला योग्य न्याय मिळवून दिला.
वृत्तपत्र हे प्रसार माध्यमांचा मुद्रित (छापील) प्रकार आहे प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथास्तंभ आहे. देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि समाज जीवनाची निगडित असलेल्या प्रत्येक घडामोडीचे भान समाजात देण्याची जबाबदारी प्रसार माध्यमावर आहे प्रसार माध्यमे दुधारी हत्यार आहे.समाजाला चांगला विचार देण्याचे जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे आणि हे काम आपण योग्यरित्या पेलता ही आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
या युवा पत्रकाराविषयी मला आपणास सांगायचं आहे की हे व्यक्तीमत्त्व रडणारे नसून लढणारे आहे.
मोठी छोटी पण कीर्ती महान कमी वयात त्यांनी सामाजिक भावनेतून व लेखनीच्या
माध्यमाद्वारे आपल्या सामाजिक कार्याचा जो ठसा उमटवीला ही आदिवासी कोळी महादेव जमातीचे दृष्टीने गौरवाची बाब आहे.
त्यांचे सामाजिक कार्य हे खुप मोठे आहे परंतु मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला.
जनसेवा हीच ईश्वर सेवा
मधुकर पुर्णाजी तराळे
कवी ,लेखक
विरार मुंबई
आपल्या प्रतिक्रिया द्या....