अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी संपूर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जात आहेत. नुकताच वर्ग १० व १२ चा निकाल लागला आहे. अनुकूल परिस्थितीत आपल्या अपंगत्वावर मात करून ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. अशा सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे जाहीर सत्कार केला जाणार असून गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाचक व लेखनिक म्हणून ज्यांनी कार्य केले अशा स्वयंसेवकांचाही सत्कार संस्थेतर्फे आयोजित केला आहे .
अशा दिव्यांग विद्यार्थ्यांनी व त्यांच्या स्वयंसेवकांनी आपले नावे २५ जून २०२३ पर्यंत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ०९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवावे आपली गुणपत्रिका , दिव्यांगत्व प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती मिळण्यासाठी भरल्या जाणारा अर्ज प्रत्यक्ष संस्थेच्या कार्यालयात अपेक्षा अपार्टमेंट क्र.२ , फ्लॅट क्र.७ , गणेश नगर , लहान उमरी , अकोला येथे येऊन जमा करावा* . या सामाजिक उपक्रमात सर्व सामाजिक संस्था व अकोल्यातील शैक्षणिक संस्था यांनी सहकार्य करावे . असे आव्हान दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे अनामिका देशपांडे, डॉ.संजय तिडके, भारती शेंडे , मुख्याध्यापक अरुण राऊत , विजय कोरडे , अरविंद देव ,विशाल भोजने , अंकुश काळमेघ, संजय फोकमारे, पुजा गुंटिवार , सुजाता आसोलकर व उत्कर्ष जैन यांनी केले आहे.