"भारतीय लोकशाही मध्ये पत्रकारांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जात असले तरीही इतरांच्या दुःखांना वाचा फोडून न्याय मिळवून देणारा पत्रकार हा स्वतः मात्र उपेक्षितच राहीलेला असून, राज्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्याला उपेक्षितच ठेवलेले आहे. त्यामुळे पत्रकार हा आर्थिक परिस्थितीने दुर्बल व मागासलेलाच राहीला आहे. "पत्रकारिता म्हणजे निःस्वार्थ सामाजिक कार्य समजून सतत सेवारत राहणाऱ्या पत्रकाराची ना शासनाला पर्वा आहे. ना लोकप्रतिनिधी यांना पर्वा.त्यामुळे या राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी त्याचेवर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल वाईट वाटते. कुठेतरी अतिशय शल्य जाणवत."जी पत्रकार आणि लघुपत्रकार मंडळी दगडाला शेंदूर फासून त्याला देवत्वाचे स्थान मिळवून देतात. म्हणजेच सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक जिंकून देत,आमदार - खासदार बनवून लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेत पाठवतात. आणि पत्रकारांच्या जीवावर जे लोकप्रतिनिधी सत्ता उपभोगत असतात. पुढे मात्र एकदा का त्यांना सत्ता मिळाली की, पत्रकारांना पार विसरून जातात . पुढे मात्र लोकप्रतिनिधी आणि त्यांचे चमचे केवळ स्वतःचा ऊदो ऊदो करीत स्वतःच्या छोट्याशा कार्यक्रमाच्या बातम्या पाठवून आपण खूप मोठे कार्य केल्याचा आव आणून, फुकट प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात. ज्या पत्रकारांनी त्यांना विधानसभेत किंवा लोकसभेत प्रतिनिधीत्व करायला पाठवीले त्या उपकारकर्त्या पत्रकारांचा आदर करीत स्व मनाने त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने जाहिराती देतच नाहीत. आणि एखाद्या पत्रकाराने त्यांना जाहिरात मागीतली तरी उद्धटपणाने टाळाटाळ करतात .पत्रकार व त्याच्या कुटूंबाचा त्यांचे उदरनिर्वाहाचा विचार करीत नाहीत. आज लघु पत्रकारांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते ? याचेशी या लोकप्रतिनिधींना काहीच सोयरसुतक नसते. आज कागदाचे भाव गगनाला भिडले आहेत . प्रिन्टीग चार्ज, पार्सल चार्ज, दुप्पट तिप्पटीने वाढलेले आहेत. परंतु हे आमदार खासदार मात्र जणू काही अनभिज्ञ असल्या प्रमाणे वागतात. आता लक्षात घ्या . कोरोना महामारी संपली त्यामुळे यांची दिवाळी जल्लोषात साजरी होणार ! हे लाखो रुपयाचे फटाके उडविणार !! त्यांच्या कार्यकर्त्याची आणि सोबतच त्यांच्या चमच्यांची सुद्धा चांदी होणार. वर त्यांच्या फालतू उधळपट्टीच्या बातम्या प्रसिद्धीला पाठविणार . आता मात्र आमच्या लघुपत्रकारांनी हे कोठेतरी थांबवले पाहीजे. तुमच्या घरात तुम्ही व तुमचे कुटूंब कसे जगता ? प्रचंड महागाईतही लघुवृत्तपत्र कसे काढता ? याचा विचार जर यापुढे आमदार खासदार लोकप्रतिनिधी करणारच नसतील . दिवाळी सारख्या सणाला सुद्धा लघुवृत्तपत्राला ही सत्तापिपासू लोकप्रतिनिधी जाहिरात देणारच नसतील तर यापुढे यांच्या प्रत्येक कार्यक्रमांवर आपण बहिष्कार टाकलाच पाहीजे. शिवाय त्यांना यापुढे फुकट प्रसिद्धी देऊ नये. अशा मताचा मी तरी आहे. लेखक : संजय कडोळे, जिल्हाध्यक्ष - महाराष्ट्र साप्ता. ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम . मो.9075635338*