कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) कारंजा पंचक्रोशीतील ग्राम शेलूवाडा येथील श्री चवऱ्या महादेव संस्थान शेलुवाडा येथे आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेच्या वतीने,जागतिक तंबाखू दिन विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेची संस्थापक अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड यांनी केले होते.आजची तरुण पिढी तंबाखू ,, गुटखा , बिडी, सिगारेट, चरस, गांजा, भांग, दारू यासारख्या दुदैवी व्यसनाच्या अधीन होऊन आपल्या शरीर संपत्तीचा ऱ्हास करीत असून, समाजात बदनाम होत आहे.तंबाखू सारख्या घातक स्लो पॉयझन मुळे कर्करोग, क्षयरोग, दमा रोगाला बळी पडून आपल्या हाताने आपला मृत्यु जवळ करीत आहे. विशेषतः आजची तरुणाई बिडी-सिगार-चिलम द्वारे गांजा चरस सेवन करून नशाधीन होऊन नको असलेले कारनामे करून स्वतःचे, कुटूंबाचे आणि समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान करीत आहे. व्यसनाधिन झाल्याने तरुणाईवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. व्यसनामुळे अनेक तरुणाचे लग्न जुळत नाहीत. हे कटूसत्य आहे. त्यामुळे स्वतःचे वैयक्तिक नुकसान करणाऱ्या तंबाखू या घातक विषाणू पासून तरुणाईने दूर राहीले पाहीजे. तुम्ही आजच तंबाखूजन्य विषारी व्यसनाचा त्याग केलात तर तुमचे पुढील भवितव्य-पुढचे आयुष्य रोगमुक्त आणि सुखकर होणार आहे. त्यामुळे तरुणाईने, तंबाखू व तंबाखूजन्य इतर नशायुक्त व्यसनापासून दूर राहण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन समाजसेवी डॉ . ज्ञानेश्वर गरड यांनी युवकांना केले आहे. या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला शेलूवाडा येथील ग्रामस्थ सौ देवकाबाई मोडक , सौ कमलाबाई मस्के , सौ जिजाबाई मस्के, श्रीमती शांताबाई गरड , सौ चंद्रकलाबाई मस्के, सौ रखमाबाई वानखड, श्रीमती अनिता वानखडे, अनिल मस्के , जिरे रामदासभाऊ कांबळे इत्यादीची उपस्थिती होती. शिवाय शेलुवाडा येथील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंजाबराव मस्के यांनी केले.