.वाशिम : वाशिम जिल्हयातील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे विश्वस्त संचालक तथा मानवसेवेकरिता कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे आजिवन प्रचारक असलेल्या
त्रिमुर्ती लोमेश केशवराव पाटील चौधरी, विजय बाबुराव पाटील खंडार तथा संजय मधुकर कडोळे यांची मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी द्वारा " राज्यस्तरिय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2022 करीता निवड करण्यात आलेली
असून रविवार दि 30 आक्टोंबर रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी द्वारा आयोजित, पलूसकर हॉल सभागृह , पंचवटी नाशिक येथे होणार्या राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार समारंभाच्या शाही कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ विजयकुमार शहा तथा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष एड कृष्णाजी जगदाळे यांचे हस्ते त्यांना हे पुरस्कार देण्यात येणार
असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे शहर अध्यक्ष तथा पत्रकार उमेश अनासाने यांनी प्रसिद्धी पत्रकात कळवीले आहे.