वाशिम : आज सार्वत्रिक निवडणूका जवळ आल्याचे हेरून,एकीकडे केन्द्रशासन राज्यशासन विविध घोषणांचा पाऊस पाडीत,आमदारांच्या विकास निधीतून होणारी कामे मार्गी लावत असून,नागरिक मतदार यांना आकर्षित करीत आहे.तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात गेल्या 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांपासून जवळ जवळ पाच वर्षापासून जिल्ह्यात सन्माननिय पालकमंत्री महोदयांनी,जिल्ह्यातील विकासकामे करणाऱ्या,विविध समस्यांचे निवारण करणाऱ्या, आणि स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आमदार-खासदार यांना निवडणूकीत विजयी करण्याचे शिलेदार होणाऱ्या,राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान वाढविणाऱ्या,शासकिय-निम -शासकिय समित्यांचे गठणच केलेले नाही.यातही विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील आ. लखनजी मलिक,आ.अमितजी झनक आणि आ. राजेंद्र पाटणी असे तिनही आमदार पालकमंत्री महोदयांकडे शासकिय निमशासकिय समित्याच्या गठनाबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत.याचेच आश्चर्य वाटते. जिल्हा नियोजन समिती,जिल्हा दक्षता समिती, जिल्हा पुरवठा समिती,जिल्हा आरोग्य समिती, जिल्हा एस टी महामंडळ बोर्ड, जिल्हा दिव्यांग समिती,जिल्हा संजय गांधी योजना समिती, जिल्हा वृद्ध साहित्यीक व कलावंत मानधन निवड समिती इत्यादी अनेक समित्यांचे गठण रेंगाळलेले असल्यामुळे, शासकिय-निमशासकिय समित्यांद्वारे होणारी नागरिकांची बहुतांश कामे वाशिम जिल्ह्यात रेंगाळलेली आहेत.तरी निदान आता सार्वत्रिक निवडणूकांच्या तोंडावर तरी,अशा अनेक समित्यांवर,निवडणूकीत आमदार,खासदार,मंत्र्यांकरिता अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि निष्पक्ष राहून समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना,ना. संजयजी राठोड पालकमंत्री यांनी सामावून घेऊन शासकिय निमशासकिय समित्यांचे लवकरात लवकर गठण करावे.अशी आर्त हाक जिल्ह्यातील विदर्भ लोककलावंत संघटनचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याविषयी बोलतांना त्यांनी सांगीतले की,गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या,जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीचे गठन जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडून अद्यापही झाले नसल्यामुळे,जिल्ह्यातील हजारो लोककलावंताचे मानधनाचे प्रस्ताव आज रोजी धुळ खात पडलेले आहेत.गेल्या पाच वर्षात, जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीकडून,कमित कमी चार वार्षिक बैठका जरी झाल्या असत्या तरी सुद्धा चारशे ते पाचशे वृद्ध लोककलावंताचे प्रस्ताव मंजूर होऊन,त्यांची वृद्धापकाळाची उदरनिर्वाह आणि औषधोपचाराची व्यवस्था होऊ शकली असती.परंतु आताही हरकत नाही पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड आणि जिल्ह्यातील आ.लखनजी मलिक आ.अमितजी झनक आ. राजेन्द्र पाटनी यांनी सामान्य नागरिकांच्या विकासाकडे लक्ष्य देवून लवकरात लवकर विविध समित्यांचे गठन करण्याची मागणी पूर्ण करायला हवी आहे. असे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग संजय कडोळे यांनी सांगीतले.