२१ जून जागतिक योगदिन तथा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष या पर्वावर ब्रम्हपुरी येथे दिनांक २१ जून ला सकाळी ५:३० ते ७:०० या कालावधीत नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रांगणात पतंजली योग समिती , भारत स्वाभिमान , महिला पतंजली योग समिती , युवा भारत , पतंजली किसान सेवा समिती तालुका ब्रम्हपुरी , ने.ही.महाविद्यालय एन.सी.सी.विभाग तसेच नगर परिषद ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
योगमय जीवनाचा अवलंब करून निरोगी निरामय आयुष्य प्राप्त करण्यासाठी सर्व नागरीकांनी योग महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पतंजली योग समिती तालुका ब्रम्हपुरी व जिल्हा प्रभारी भगवान पालकर यांनी केले आहे.