वाशीम : शासन स्तरावरून दिव्यांगाच्या ऑनलाईन प्रमाणपत्राची आणि दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच युडी-आयडी कार्ड पडताळणीची मोहीम सुरू असल्यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तींनी आपआपल्या कायम स्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्राची आणि दिव्यांगाच्या वैश्विक ओळखपत्राची युडी-आयडी कार्डाची खात्री करून (के वाय सी) पळताडणी म्हणजे अपडेट करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिव्यांगांना केले आहे. त्याकरीता दिव्यांग व्यक्तींनी आपले 1) युडी आय डी कार्ड 2) आधार कार्ड 3) जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच जन्म झालेल्या रुग्नालयाचे प्रमाणपत्र ; कोतवाल बुकाची नक्कल (ग्रामपंचायत किंवा नगर पालिकेतून मिळालेला जन्मदाखला) किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र व आपला स्वतःचा आधार कार्ड लिंक असणारा मोबाईल फोन घेऊन जवळच्या सेतू किंवा ग्राहक केन्द्रावर जाऊन आपले युडी-आयडी कार्ड अद्यावत करून घ्यावे म्हणजेच युडी-आयडी कार्डची पडताळणी करून घ्यावी.या संदर्भात अधिक वृत्त असे की,सद्यस्थितीत डिसेंबर 2024 पासून दिव्यांग बांधवाना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेतून देण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार व राष्ट्रिय दिव्यांग योजनेतून मिळणाऱ्या 1500 रु. च्या मानधनातत 1000 रु.ची वाढ करण्यात आलेली असून, दि 15 सप्टेंबरच्या शासनआदेशाने ऑक्टोंबर 2500 रु.मानधन देण्यात येत आहे.यामध्ये ज्या ज्या दिव्यांगानी आपले युडी-आयडी कार्ड आधारकार्ड जन्मतारीख आणि मोबाईल अपडेट करून दिले त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून डी बी टी (थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे) 2500 रु मानधन जमा झालेले आहे.परंतु ज्या दिव्यांगानी युडी-आयडी कार्डा सोबत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक दिले नसतील त्यांच्या खात्यात केवळ 1500 रुपये जमा झाले आहेत.तरी ज्यांना ऑक्टोंबर महिन्यात 1000 रु.कमी मिळाले.अशा सर्वच दिव्यांगानी एकदा सेतू ग्राहक केन्द्रावर जाऊन आप आपल्या युडी-आयडी कार्डाची (के वाय सी ) पडताळणी करून घेऊन 1) आपले ऑनलाईन प्रमाणपत्र झेरॉक्स 2) युडी-आयडी कार्ड झेरॉक्स 3) आधारकार्ड झेरॉक्स व लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन संबधीत तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजना विभागाशी संपर्क साधावा.म्हणजे त्या कार्यालयात त्यांच्या खात्याची पडताळणी होऊन,त्यांना पुढील महिन्या पासून दरमहा 2500/- रु मानधन मिळण्याचा मार्ग सुकर होईल.तसेच इतरही दिव्यांगानी आपआपल्या युडी-आयडी कार्डाची केवायसी पडताळणी करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सर्व दिव्यांग व्यक्तींकरीता केले आहे.