"सप्तखंजेरी लोककलावंत तथा राष्ट्रीय प्रबोधनकार श्री. सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार "महाराष्ट्र भूषण" देण्यात यावा.सर्व महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थीना शासनाने दरमहा मानधन सुरु करावे. लोककलावंताना देण्यात येणारे मानधन महागाईचा वाढता आलेख लक्षात घेऊन दरमहा किमान पाच हजार रुपये करावे.महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थीना शासकिय निमशासकीय समित्यावर पदाधिकारी म्हणून नियुक्त करावे तसेच लोककलावंताना रेल्वे प्रवास मोफत करावा. ज्येष्ठ लोककलावंत संजय कडोळे यांची शासनाकडे मागणी." *कारंजा (लाड)* स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांचे कडून, लोककलावंताच्या न्याय्य हक्का करीता,येत्या नविन वर्षातील जानेवारी महिन्यात दि.24 जानेवारी 2024 रोजी लोककलावंताचे क्रांतिकारी धरणे आंदोलन करण्याचा चंग बांधला असून त्याकरीता बुधवार दि.13 डिसेबर 2023 रोजी,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे संस्थाध्यक्ष यांनी,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून,जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सप्तखंजेरी प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार "महाराष्ट्र भूषण" देण्यात यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्व पुरस्कारार्थी (जसे की, डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार इत्यादी पुरस्कारार्थींना) दरमहा विशेष मानधन देण्यात यावे. लोककलांवतांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करून दरमहा मानधन किमान पाच हजार रुपये करावे. जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती स्थापन करावी.सर्व महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी यांना शासकिय निमशासकिय समित्या मध्ये पदाधिकारी म्हणून स्थान मिळावे. महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंताना रेल्वे प्रवास मोफत करावा.अन्यथा सदर्हु मागण्यांकरीता दि.24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट असे क्रांतिकारी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथा दिव्यांग जनसेवक असलेले विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी निवेदनाद्वारे शासनाला कळवीले आहे.