आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची समाजाला खरचं आवश्यकता आहे. आज पुरुष प्रधान संस्कृतीची बळी ठरलेल्या अनेक महिलांच्या वार्ता आपण ऐकत असतो. स्त्री अबला की सबला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या युगात स्त्री ही सबला झाली आहे. ती शिक्षण, नोकरी करीत आहे. आता समाजात स्त्रिला योग्य स्थान मिळत आहे. आजचा तरुण हा वासनांध बनला आहे. त्याची हैवान, राक्षसी वृत्ती बळावली आहे. आजही स्त्री वरील अत्याचार, हिंसाचार, बलात्कार कमी झालेले नाहीत. स्त्री ही कधीच अबला नव्हती, आजही नाही. स्रियापेक्षा पुरुष मानसिक दृष्ट्या लवकर खचतो. स्त्री ही भावुक. वत्सल व समाज जीवन पुढे नेण्यास सहाय्य ठरते. स्वार्थाने बरबटलेल्या कुविचाराने माखलेल्या ह्या समाजाने सर्वप्रथम स्त्री जातीचा सन्मान करणे शिकावे. जो स्त्रिचा अपमान करतो जो आईचा अपमान करतो. जो आईचा अपमान करतो तो देवाचा अपमान करतो. जो देवाचा अपमान करतो त्याचा विनाश निश्चित आहे. घरातील स्त्री ही समाजाचे ऋण फेडण्यास महत्वाची कामगिरी बजावते व मानव समाज संतुलित ठेवते. स्त्रीने ठरविले तर जगाचे उत्थान होऊ शकते. स्त्रिला नुसते भोगवस्तू म्हणून का ठरविता. ती देवी आहे, कधी कधी ती रणचंडिका सुद्धा बनते.
इन्सान तेरी आँखमें, क्या धूल पड गयी ।
हैवान की ताकत तो तेरे, सर पे चढ गयी ।।धृ।।
आजचा तरुण खून, बलात्कार, भ्रष्टाचार करणारे कुण्यातरी मातेचेच पुत्र असतात ना. महिलांवर एवढे अत्याचार होत आहे. त्यामुळेच अत्याचाराने देश ग्रासला आहे. हा वासनांध तरुण मार्गाने जाणाऱ्या परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघतो. परस्त्री मातेसमान, बहिणीसमान त्यांना का बघू नये. स्त्रिला भोगवस्तू समजू नये. नराधम एकट्या स्त्रिला बघताच तिला बेअब्रू करतात. हा तरुण क्रूरतेने, पशुवृत्तीने वागतो. मानवतेचे मूल्ये विसरुन जातो. कारण त्याचे डोळे क्रोधाने, हिंसक वृत्तीने बरबटलेले असतात. त्याला कुठेही मानवता दिसत नाही. तो वाईट मार्गावर चालत असतो. त्याचे डोळ्यात वासनेची धूळ पडली आहे. म्हणून तर त्याचे जीवन अंधकारमय आहे. त्याची पशुतुल्य वृत्ती मानवतेची मूल्ये गमावून बसली आहे.
नेकी किसे कहते, जिसे कुछ भी न ख्याल है ।
मजहब तो भरे आँखसे, कहता जो बाल है ।
जो दिलमें हो वही करे, पाबंद ही नही ।।१।।
नेकी म्हणजे दुसऱ्याचं भलं करणे, चांगले काम करणे, मनात स्वार्थ नसणे, कोणतीही अपेक्षा न करणे होय. पण तो स्वतःमध्ये कोणतेही परिवर्तन, बदल जीवनात सुधार करु शकत नाही. आपला धर्म शिकविते की, दुसऱ्या सोबत करुणा, सहानुभूतीने वागा. चांगला व्यवहार करा, कमजोर असेल त्याला सहाय्य करा, मदत करा. तुला धर्म अजून कळलेलाच नाही. तुझ्या डोळ्याने वाईट दिसतं पण चांगलं कधीच दिसत नाही. देवा धर्माला मानत नाही. "मजहब नही सिखाता, आपसमें बैर रखना" तुझ्या मनात असेल तसे तू वागतोस. बंधन सारे झुगारुन देतोस. अजून तरी तुझ्यातील हैवानियता, राक्षसी वृत्ती नाहिशी झालेली नाही.
खाना पकाने कौन, उसे उडावे कौन ।
बाँधे मकान कौन, उसे धमकावे सोवे कौन ।
लाठी उसीकी भैस यह, कहनात बढ गयी ।।२।।
खाना पकाने कौन, उसे खावे उडावे कौन, या वाक्याचा अर्थ असा की, जो व्यक्ती दुसऱ्याचे भरवश्यावर जगतो. त्याला नुकसान झाले काय आणि फायदा झाला काय? याचेशी त्याचे मुळीच देणे घेणे नाही. मनुष्य घर बांधतो, मेहनत करतो, घरादाराची संपूर्ण जबाबदारी घेतो. तो "आयत्या बिळात नागोबा" सारखं दुसऱ्याने बांधलेल्या घरात राहतो. त्याच्यावर धमकावण्याचा सुद्धा असर होत नाही. कामधंदा करणे त्याचा जीववर येते. सोवे म्हणजे झोपणे नाही तर जागणे किंवा जागरुक असणे, सावध, सजग राहणे. घरात राहणे म्हणजे आनंद घेणे. घराचा उपयोग चांगल्या प्रकारे करणे. तो मनुष्य कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाही आणि कोणत्याही परिणामाची चिंता मुळीच करीत नाही. एक म्हण प्रचलितआहे, "जिसकी लाठी उसीकी भेस" काठी रक्षण करण्याकरिता वापरली जाते. कहनात बढ गयी म्हणजे बिनकामाची अफवा किंवा बिनकामाच्या चर्चेला समोर करणे.
रास्ता नही चलनेको, किधर कौन जा रहा ।
वाहवा रे समय गजबका, आँखोमें छा रहा ।
आगे तो मजल दूर है, इज्जत फना हुई ।।३।।
समोर जाण्याकरिता योग्य मार्ग नसतांना कोणत्या दिशेला जायचे याचा विचार करणे योग्य नव्हे तर चांगल्या मार्गावर चालणेच योग्य आहे. समय म्हणजे वेळ खूप झपाट्याने समोर जात असतो. वेळ कुणासाठी वाट पाहत नाही किंवा थांबत नाही. वेळ निघून जाते आपल्या डोळ्यादेखत आणि आपण पाहतच राहतो. "आगे चल नौजवान आगे चल समय नही रुकनेका" मंजिल या मजल म्हणजे लक्ष. व्यक्तीची इज्जत आणि सन्मान धोक्यात असते तेव्हा लक्ष प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपली इज्जत आणि सन्मान जाऊ नये. इज्जत फना होणे म्हणजे इज्जत नष्ट होणे, सन्मान धोक्यात असणे होय. लक्ष दूर आहे ते साधण्यासाठी, उद्देश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल.
इश्वर की दया माँग, याद कर घडी घडी ।
जो है उसे सुधारले, न दम गमा गडी ।
तुकड्या कहे संसारकी, गाडी अड गयी ।।४।।
चांगले कार्ये करण्यासाठी परमेश्वराकडे दयेची याचना कर. त्याची कृपा असावी लागते. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी परमेश्वराची आठवण कर आणि त्याचे नामस्मरण कर. इश्वराची घडोघडी आठवण व्हावी. आतातरी सुधारले पाहिजे. चांगल्या मार्गाने चालायला हवे. न दम गमा गडी म्हणजे वेळ वाया किंवा व्यर्थ घालवू नकोस. जीवनात अनेक समस्या येतात आणि जातात. त्यामुळे जीवनाची गाडी अडखळते, थांबते तेव्हा समस्या निर्माण होते. समस्या पूर्ण करण्यासाठी तय्यार असावे. संसाराची गाडी बरोबर चालेल अडणार नाही. शेवटी राष्ट्रसंत समाजातील मनुष्याला संदेश देतात.
अब तो आँखे खोल बंदे ।।
निती गयी दुनियाँ से सारी ।
प्रित हुयी मतलब की प्यारी ।
जिधर उधर चल बलका में जन ।
मिले न निर्मल हो....।।
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....