सिंदेवाही वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या करगाटा जंगल परिसरातील घटना
सिंदेवाही:-
आज दुपारी सुमारे साडेबारा वाजताच्या दरम्यान तेंडुपत्ता संकलनाकारिता गेलेले 45 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना सिंदेवाही वनपरीक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कारगाटा च्या जंगल परिसरात घडली आहे.

आज सिंदेवाही वनपरीक्षेत्रामधील सिंदेवाही उपक्षेत्रातील नियतक्षेत्र कारगाटा मध्ये श्री. प्रभाकर अंबादास वेठे रा. डोंगरगांव (सा.) वय 45 वर्ष, हा इसम जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्याकरिता गेला असता, कक्ष क्र. 257 मध्ये दुपारी अंदाजे साडेबारा वाजताच्या सुमारस वाघाने हल्ला करून ठार मारले. सदर घटनेची माहिती सिंदेवाही वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. व्ही. ए. सालकर व कर्मचारी आणी आर.आर.यु. पथक सिंदेवाही घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांना घटना स्थळी बोलवण्यात आले. घटनास्थळाची चौकशी करून उत्तरीय तपासणी करिता कॉटन स्वाब सॅम्पल घेण्यात आले. तसेच आजुबाजूचा परिसर फिरून पाहण्यात आले. वाघाचे छायाचित्र मिळविन्याकरिता घटनास्थळाच्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. त्यानंतर घटनास्थळाचा मोका पंचनामा करून पोलीस विभागानी मृतकाचे शव विच्छेदांनाकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे आनण्यात आले. त्या ठिकाणीच मृतकाची पत्नी श्रीमती सीमा प्रभाकर वेठे यांना तातडीची आर्थिक मदत रुपये 25000/- रोख देण्यात आले.