कारंजा : "इच्चूकाटा"या विनोदी काव्यमैफिलीचे जनक असलेले विदर्भातील नामांकित युवा कवीवर्य, जिल्हा परिषद उच्च प्राथ.मराठी शाळेचे आदर्श शिक्षक हे पर्यावरणप्रेमी,पक्षीमित्र वृक्षमित्र म्हणूनही ओळखले जातात. शिवाय अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणूनही ते लोकप्रिय आहेत. युट्युब फेसबुकवर त्यांचे हजारो चाहते आहेत.
दरवर्षी ते उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चिऊताई व पक्षाची शेकडो घरटे वाटून पक्षाच्या निवासाची आणि पावसाळ्यात सिडबॉल वाटून व विविध प्रकारच्या आयुर्वेदिक औषधीसह,फळा फुलांच्या बियाचे व रोपाचे वृक्षारोपण करतात त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेवून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधीत, स्थानिक आदर्श जय भारत सेवाभावी संस्था काळी कारंजा
आणि विदर्भ लोककलांवत संस्था कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने, अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गरड,पत्रकार संजय कडोळे,नंदकिशोर कव्हळकर,डॉ.आशिष सावजी, रोमिल लाठीया, गोपीनाथ डेंडूळे, डॉ. इम्तियाज लुलानिया, उमेश अनासाने इ.नी पुष्पगुच्छ व शाल देवून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर गरड ,संजय कडोळे यांनी उपस्थितांना गोपाल खाडे सर यांच्या अनमोल कार्याची माहिती देवून त्यांना पुढील वाटचालीच्या अनंत शुभेच्छा दिल्या.