अकोला-- आत्मा हा शक्तीमान असून तो सर्वशक्तीमान परमेश्वराचा अंश असल्याने त्या माध्यमातून मिळालेल्या शक्तीचा अपव्यय न करता तिचा उपयोग स्वत:च्या शरीराची सुरक्षितता,व आनंदी जीवनातील विधायक विकासासाठी करावा.षडरिपूंच्या वशीकरणाने शरीर आणि मनावर येणारे अनावश्यक ताण टाळून असंख्य आजारांपासून वाचण्यासाठी मनुष्याने विपरीत घटनांचा मनावर होणारा प्रभाव टाळण्याचा सराव करावा.कोणत्याही परिस्थितीत विचारांना स्थिर ठेऊन मनाच्या संतुलित अवस्थेतून आणि सकारात्मक विचारशक्तीतून स्वतःला कमजोर न समजता स्वयंभू,सर्वशक्तीमान समजावे व प्रबळ आत्मविश्वासाने जीवन जगावे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अकोला केंद्राच्या बि.के. डॉ.संजीवनी जवादे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या १० व्या विचारमंथन मेळाव्यात "आनंदी जीवन जगण्याचे रहस्य" या मानवी जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या एका वेगळ्या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम अकोल्यात जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे आयोजित केला होता.त्यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.जेष्ठ साहित्त्यिका,अकोला येथील रजधुळ मासिकाच्या संपादिका,व पत्रकार संघाच्या जेष्ठ मार्गदर्शिका देवकाताई उर्फ माई देशमुख ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी व्यासपिठावर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व जन्मदिन अभिष्टचिंतनातील सत्कार मुर्ती प्रा.राजाभाऊ देशमुख,अकोला संग्राम चे संपादक संदिप देशमुख उपस्थित होते.

. सर्वप्रथम पत्रकार महासंघाच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे अधिष्ठाण समाजोध्दारक संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हारार्पण करून वंदन करण्यात आले. जन्मदिन अभिष्टचिंतनातील सत्कारमुर्ती, उपस्थित अतिथी व सि.ए गिरीराज घुरका यांना यावेळी कार्यगौरव सन्मानपत्र,शाल व गुलाब वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.देवकाताई देशमुख यांनी अल्पावधितच संघटनेने गाठलेल्या लेल्या प्रगतीच्या आलेखाचे कौतुक करून महाराष्ट्र व राज्याबाहेरील व्यापक संघटनकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.प्रास्ताविक भाषणातून संजय देशमुख यांनी संघटनेप्रती आदरभाव, सेवाभावी वृत्ती, आणि शिस्तीच्या कर्तव्यबध्द वाटचालीतून संघटनशक्ती वाढविण्याचे आवाहन केले. संघटनेला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय कोषाध्यक्ष सिध्देश्वर देशमुख यांनी पाहूण्यांचा परिचय दिला.यावेळी उपस्थित नव्या सभासदांच्या ओळखपत्राचे वितरण सुध्दा करण्यात आले.

केंद्रीय पदाधिकारी सौ.जया भारती इंगोले यांच्या सुत्रसंचालनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,किशोरजी मानकर,सचिव राजेन्द्रजी देशमुख,मार्गदर्शक प्रा.डॉ.संतोषजी हूशे,भारत कपास निगमचे ऑरबिट्रेटर अॕड.नितीनजी अग्रवाल,साहित्त्य व संस्कृती मंडळाचे सदस्य,कादंबरीकार पुष्पराजजी गावंडे,डॉ.शंकरराव सांगळे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी अशोकुमार पंड्या,सुरेशजी ठाकरे,विवेक मेतकर,सागर लोडम,मंगेश चऱ्हाटे,दिपाली बाहेकर, सुरेश डहाके,मनोहर मोहोड,प्रताप देशमुख,विजयराव देशमुख,सतिश देशमुख,प्रकाशसेठ नावकार (अडगांव),शाम कुलकर्णी,रवि पाटणे,सोमेश्वर पाचपोर,नारायणजी घुरका,व इतर सभासद उपस्थित होते.आभारप्रदर्शन केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....