पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी अंतर्गत मौजा भालेश्वर येथे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्या लोकांवर ब्रम्हपूरी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडून नगदी कॅश, मोबाईल ई. वस्तू जप्त करण्यात येउन त्यांचेविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दि.06/05/22 रोजी सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, भालेश्वर गावालगत असलेल्या शेताजवळ काही लोक अंधाराचा फायदा घेउन ताश पत्त्यावर पैशाची बाजी... लावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत. त्यावरून ब्रम्हपूरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन धाड टाकली. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 8 जणांना पकडण्यात आले. त्यांची अंगझडजी घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या 1,04,900 रू. 5 मोबाईल एकूण किंमत 30000 रू. 50 रू. ताशपत्ते 100 रू टॉर्च असा एकूण 135000 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणान्यांना पो.स्टे.ला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही श्री. मीलींद शिंदे, उपविभागीय पोलीय अधिकारी, ब्रम्हपूरी, पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी मोरेश्वर लाकडे, पोहवा / अरून पीसे, नापो / मुकेश गजवे, पोशी / नरेश कोडापे, प्रमोद सावसाकडे, अजय नागोसे यांनी केली..