मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्राम रुई ह्या गावामध्ये अयोध्या येथे पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन, प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे गावकऱ्यामध्ये सर्वत्र आनंद,उत्साह,व चैतन्याचे वारे वहात असून,गावकऱ्यानी आनंदोत्सव सुरू करीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्या सोबतच,श्री संकटमोचन हनुमान मंदिर रुई येथे प्रभू श्रीरामचंद्र भक्त मंडळीसह समस्त गावकऱ्यांनी, दि. 22 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 04:00 ते गावकरी व भाविकांच्या आगमनापर्यंत भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे आमचे प्रतिनिधी हरिओम गावंडे यांचे कडून सर्व भाविकांना कळविण्यात येत आहे .आनंद होतो की 22 जानेवारी रोज सोमवारला आयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, त्यानिमित्त रुई येथे प्रभू श्री रामचंद्र भक्त मंडळा तर्फे भव्य महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे .