दिनांक 3 जुन 2023ला वैरागड येथील लोकविद्यालयामध्ये तालुका माळी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील सर्व माळी समाज संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तालुका माळी समाज संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष विजयजी गुरणुले यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार भीमरावजी पात्रीकर, जिल्हा सदस्य मंगलदाजी कोटरंगे ,गुरुदासजी बोरुले, मधुकर ठाकरे,लठ्ठे मॅडम, प्रतिभाताई बनकर, नंदरधनेताई, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत रणजीतभाऊ बनकर यांची एकमताने तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
समाजाच्या हितासाठी माझी निवड करण्यात आली आणि मी समाजाला पुढे नेण्याची प्रयत्न करेन समाज बांधणी अगोदर करून समाजातील सर्व सदस्यांना समान हक्काने समाजाची एकजुटीने बांधणी करून समाजाला पुढेण्याचे कार्य करणाऱ्या चे प्रयत्न करेन.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेश वाडगुरे आणि आभार लोमेश कोटरंगे यांनी मानले व इतर माळी समाज सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित होते