राज्यातील सर्वच शाळेच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्राच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. अशातच, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वाव मिळावा आणि त्यांना चित्रकलेची आवड निर्माण व्हावी. ह्यासाठी, "न्यू लाईफ बहुउद्देशीय संस्था- ब्रम्हपुरी., आष्टेडू मर्दांनी आखाडा असोशिएशन- चंद्रपूर जिल्हा, आणि कलाकृती फाऊंडेशन- नागभीड" मार्फत संयुक्त विद्यमाने ब्रम्हपुरी शहरात विविध प्रकारच्या दोन वयोगटांमध्ये चित्रकला आणि रंगभरा स्पर्धेचे आयोजन दि.16 एफ्रील 2023 रोजी रविवाराला, लोकमान्य टिळक विद्यालय, ब्रम्हपुरी येथे करण्यात आले होते. सदर आसपासच्या शहरातील शालेय विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद देत, जवळपास 300 ते 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
ह्या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी श्री.गणेश तर्वेकर सर, शिहान- गणेश लांजेवार, विवेक गोहने, उदयकुमार पगाडे, पूनम कुथे, भूषण आंबोरकर, क्रीष्णा समरीत, सचिन भानारकर, मोहिनी भुते, तेजस्विनी भाजीपाले, श्रुती मेश्राम, श्रुष्टी आंबोरकर आदी लोकांनी अथक प्रयत्न केले.