कारंजा : आपला देश प्रजासत्ताक लोकशाहीचा पुरस्कर्ता असून येथे सर्वधर्मसमभावाला अनन्य साधारण असे महत्व आहे.मात्र निवडणुका म्हटल्या म्हणजे येथे जातीपातीला फार महत्व असते.आपल्या राज्यात अठरा पगाड जाती धर्माचे लोकं अगदी शिवकालिन हिंदवी स्वराज्या पासून नांदत असून प्रत्येक जाती धर्म लोकशाहीचा स्तंभ मानला जातो. सद्यस्थितीत कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघच नव्हे तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात सुनिल पाटील धाबेकर यांना मानणारा फार मोठा जनसमुदाय आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्वांना चिरपरिचित असलेले लोकप्रिय उमेद्वार संजयभाऊ देशमुख यांना निवडून आणण्याची जबाबदारी सुनिल पाटील धाबेकर यांनी घेतली होती.त्याकरीता त्यांनी, उन्हाळ्याचे दिवसात उष्णतेचे तापमान प्रचंड वाढलेले असतांनाही,आरोग्याची काळजी न करता,जीवाचे रान करून संपूर्ण मतदार संघच पिंजून काढला होता.व त्यांच्या अथक प्रयत्नाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील संजयभाऊ देशमुख यांची प्रचार यंत्रणा उत्तमपणे राबवीली होती. महत्वाचे म्हणजे सुनिल पाटील धाबेकर यांच्या प्रयत्नाने मराठा,कुनबी,पाटील, मुस्लिम,भटक्या विमुक्त,इमाव, इत्यादी अठरापगाड जातिधर्माच्या सर्वच मतदारांनी संजयभाऊ देशमुख यांच्या मशाल चिन्हाला मतदान केले.त्यामुळे अखेर दि 04 जून 2024 रोजी मतमोजणीतून मविआचे उमेद्वार संजयभाऊ देशमुख निवडून आल्याचे जाहीर झाले.त्याबद्दल सुनिल पाटील धाबेकर यांचे धाबेकर सभागृह कारंजा येथे राजुभाऊ देशमुख,काँग्रेस सेवादल जिल्हा समन्वयक अब्दुल राजिक शेख, जिल्हा वाहतूक सेनेचे मा.अध्यक्ष सलिम तेली, माजी सरपंच प्रदिप वानखडे,विठ्ठलराव लाड,ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे,जान मोहम्मद पठान,शेरखाँ पठान,अण्णा जमील भाई, वसीम भाई, जुबेर भाई,आरिफ भाई,गजानन चव्हान आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.