कारंजा (लाड) : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवाना शेतीविषयक मार्गदर्शनाकरीता, जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनानुसार कारंजा (लाड) येथे,मंगळवार दि 14 मे 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता स्वातंत्र्यसेनानी कन्हैय्यालाल इन्नानी (विद्याभारती) महाविद्यालया मध्ये तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांचेकरीता "शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळा" घेण्यात आली. याबाबत अधिक वृत्त असे की, शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कारंजा महसूलचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे हे होते. याप्रसंगी कार्यशाळेला प्रमुख उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी "बाल विवाह प्रतिबंधक कायदा व शेतकरी आत्महत्या थांबविण्याकरीता उपाययोजने बद्दल उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी "शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळेचे उद्दिष्टे उपस्थिताना सांगितली. कायक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख मार्गदर्शिका तथा जिल्हा सामान्य रुग्नालयाच्या मनोविकार तज्ञ डॉ. श्वेता मोरवाल यांनी शेतकरी आत्मबल उन्नती बद्दल शेतकऱ्यांचे मानसिक समाधान करण्या बाबत विशेष मार्गदर्शन केले.तालुका कृषी अधिकारी रविन्द्र जटाळे, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे, बळीराजा चेतना अभियानचे पवन मिश्रा, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती सिमा खिरोडकर, इत्यांदीनी शेती उत्पादनाचा खर्च कमी करणे, पिकपद्धती जलवायू प्रदूषण, सेन्द्रिय शेती, बालविवाह प्रतिबंधक उपाय योजना, कौशल्य व रोजगार, या विषयावर यशस्वी मार्गदर्शन केले. सदर्हु शेतकरी आत्मबल उन्नती कार्यशाळेच्या या कार्यक्रमाला सर्व नायब तहसिलदार विनोद हरणे, लक्ष्मण बनसोडे,अनिल वाडेकर, सर्व मंडल अधिकारी, सर्व तलाठी,कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल, व कारंजा महसूलचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व समारोपिय आभार, मंडल अधिकारी देवानंद कटके यांनी मानले.असे वृत्त मिळाल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.