ग्रामपंचायत पारडगाव येथील नामदेवराव ठेंगरी सामान्यतः ब्रम्हपुरी तालुक्यात परिचीत व्यक्तिमत्व असून आदर्श टेलर म्हणून सर्वमान्य व्यक्तिमत्व व मोठ्या म्हणाचे, स्वभावाने खूप गोड असून त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही कोणाशीही वैरभाव बाळगले नाही.
कायम सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या परीश्रम, जिद्द, चिकाटी आणी सर्व धर्म समभाव, अंगीकारुन सतत १५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी पुरवठा समीती अध्यक्ष असा राजकीय प्रवास करत पुंन्हा या वर्षी पारडगाव सेवा सहकारी संस्थेवर संचालक पदी त्यांची निवड झाली. यावर्षी होणाऱ्या जिल्हा परीषद , पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही महिन्यात होऊ घातल्या आहेत. यावेळी पंचायत समितीची निवडणूक त्यांनीं लढावे अशी त्यांच्या चाहत्यांनी मागणी असल्याने जनतेच्या मागणीमुळे आदरणीय ठेंगरी साहेब आशावादी आहेत.
जन आशिर्वादाने मार्गक्रमण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री. नामदेव किसन ठेंगरी हे "आदर्श टेल्लर" या नावाने सामन्यांमध्ये परीचीत आहेत.जन्मतः यांचा वास्तव्य ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथे असून यांचा ११/५/२०२२ ला ६३ वा वाढदिवस आहे.यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या स्नेही, पत्रकार मित्रमंडळी यांचे कडून त्यांना दिर्घ आयुष्याच्या लाख लाख शुभेच्या....